घरमुंबईभाजपने आमचा प्रस्ताव मान्य केला तर ठीक, नाहीतर... - अब्दुल सत्तार

भाजपने आमचा प्रस्ताव मान्य केला तर ठीक, नाहीतर… – अब्दुल सत्तार

Subscribe

आम्हाला दुसरा पर्याय अंमलात आणण्याची गरज भासणार नाही. दुसरा पर्याय तेव्हाच होईल जेव्हा ते आमचे म्हणणे मान्य करणार नाहीत. यासाठी आम्ही दुसरा पर्याय जरुर ठेवला आहे', असे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेसाठी आमचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला शंभर टक्के मान्य करतील. आम्हाला दुसरा पर्याय अंमलात आणण्याची गरज भासणार नाही. दुसरा पर्याय तेव्हाच होईल जेव्हा ते आमचे म्हणणे मान्य करणार नाहीत. यासाठी आम्ही दुसरा पर्याय जरुर ठेवला आहे’, असे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी माध्यामांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचे नवे सरकार प्रस्थापित करताना धनुष्यबाणाचा वापर होणार नाही हे लक्षात घ्यावे, असे सूचक वक्तव्य केले.

- Advertisement -

शिवसेनेचा स्वाभिमान जिवंत झाला आहे – सत्तार

‘आतापर्यंत जे घडलं ते घडलं. मात्र आता शिवसेनेचा स्वाभिमान जिवंत झाला आहे. स्वाभिमान आणि सन्मान या दोघांसह आता युती होईल आणि परत युतीचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्ष राहतील. आमच्या सहकारी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जे काही करार केले आहेत ते तंतोतंत अंमलात आणावे’, असे  अब्दुल सत्तार म्हणाले.

शिवसेनेला आर्धी मंत्रीपदे मिळतील – सत्तार

‘जो शिवसेनेचा स्वाभिमान आहे तो लक्षात घेऊन सर्व नवीन आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अधिकार दिला आहे. उद्धव साहेब रामबाण उपाययोजना करतील आणि बाण चालविण्याची गरज भासणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विशेष औषध तयार केले आहे. आमची युती अबाधित आणि कायम राहील. अमित शहा साहेब येतील आणि पुढील रुपरेषा ठरवतील. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये लेखी करार होईल आणि त्यानुसार दोन्ही पक्ष वागतील. शिवसेनेला आर्धी मंत्रीपदे मिळतील यात कोणतीही शंका नाही’, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपची ३० ऑक्टोबरला विधीमंडळ नेता निवडीची बैठक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -