घरदेश-विदेशधातू, ऑटो शेअरच्या घसरणीमुळे निर्देशांक कोसळला

धातू, ऑटो शेअरच्या घसरणीमुळे निर्देशांक कोसळला

Subscribe

मुंबई शेअर बाजारात बुधवारी मोठी उलथापालथ झाली. निर्देशांक तब्बल ३६३. ०५ अंकांनी घसरला. त्याचबरोबर निफ्टी ११७.६० अंकांनी खाली आला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३५,८९१.५२ आणि ५० कंपन्यांचा निफ्टी १०,७९२.५० अंकांवर स्थिरावला. धातू आणि ऑटो शेअरच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळला.

शेअर बाजाराचा निर्देशांक घसरणीतच खुला झाला. सलग तीन सत्रात निर्देशांकात सुरुवातीलाच घसरण झाली. मंगळवारच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४७.४४ अंकांची घसरण होऊन तो ३६,१९८.१३ अंकांवर खुला झाला. तर कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टीही ४१.२५ अंकांच्या घसरणीने १०,८६८.८५ अंकावर खुला झाला.

- Advertisement -

खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) आणि डिसेंबर महिन्यात केवळ ९४,७२६ कोटी रुपये जीएसटीद्वारे सरकारला झालेले उत्पन्न या दोन देशांतर्गत कारणांनी बाजारावर प्रभाव टाकला. या व्यतिरिक्त चीनमधील आर्थिक मंदीची शक्यता आणि आशियाई बाजारातील घसरणीनेही शेअर बाजारात खळबळ माजली. मिडकॅप निर्देशांक सव्वा टक्के आणि स्मॉल कॅप निर्देशांक ०.७५ टक्के घसरला.

निफ्टी ५० कंपन्यांच्या पॅकमध्ये आयशर मोटर्सचे शेअर ९.५ टक्क्यांनी घसरले. त्यानंतर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, वेदांता, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, हिंडाल्को, हीरो मोटोकॉर्प, गेल, भारत पेट्रोेलियम आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ३ ते ५.५ टक्के घसरण झाली. तर दुसरीकडे सन फार्माच्या शेअरमध्ये १.५ टक्क्यांची वाढ झाली. त्याशिवाय इंफ्राटेल, टीसीएस, एशियन पेंट्स, इंफोसिस, टाइटन, युपीएल, येस बँक आणि आयसीआयसीआय बँकचे शेअरमध्येही वाढ झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -