घरमुंबईLockDown: चाळ मालकाच्या मारेकऱ्यांना क्वारंटाईन कक्षातून अटक

LockDown: चाळ मालकाच्या मारेकऱ्यांना क्वारंटाईन कक्षातून अटक

Subscribe

प्रेमसंबंधास विरोध केल्यामुळे या दोघांनी मिळून चाळ मालकाची हत्या करून मृतदेह कोरड्या विहिरीत फेकून दिला

भिवंडी येथील चाळ मालकाच्या दोन मारेकऱ्यांना शांती नगर पोलिसांनी परभणी शहरातील क्वारंटाईन कक्षातून ताब्यात घेऊन गुरुवारी रात्री त्यांना अटक कऱण्यात आली आहे. अटक कऱण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका महिलेचा समावेश असून दोघांच्या वैद्यकीय तपासणी कऱण्यात आलेली असून दोघांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रेमसंबंधास विरोध केल्यामुळे या दोघांनी मिळून चाळ मालकाची हत्या करून मृतदेह कोरड्या विहिरीत फेकून दिला होता.

असा घडला प्रकार

वयवर्ष ७२ असणारे कृष्णा जोशी असे हत्या कऱण्यात आलेल्या चाळ मालकाचे नाव आहे. टेमकर पाडा भिवंडी येथे कृष्णा यांची चाळ आहे, या चाळीत लता उर्फ ३५ वर्षीय ज्योती राठोड ही भाडेतत्वावर राहण्यास होती. मूळची परभणी जिल्ह्यातील लता उर्फ ज्योती हिचे त्याच परिसरात राहणारा ३० वर्षाचा करणसिंग रामसिंह यादव याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. टेमकर पाड्यातील जोशी चाळीत राहणारी लता उर्फ ज्योती ही एकटीच राहत असल्यामुळे करणंसिग हा तिच्या घरी येत होता. चाळ मालक कृष्णा यांना याची कुणकुण लागली असता ११ एप्रिल रोजी रात्री कृष्णा यांनी दोघांना घरात नको त्या अवस्थेत बघितले आणि यापुढे असले चाळे इकडे चालणार नाही, नाहीतर घर खाली करा, असे लता उर्फ ज्योतीला आणि तिच्या प्रियकराला बजावले. कृष्णा यांचा बोलण्याचा राग आल्यामुळे करणसिंगने चाळ मालक कृष्णा सोबत भांडण करून लता आणि करणसिंग या दोघांनी मिळून कृष्णा यांचा गळा आवळून हत्या केली.

- Advertisement -

रात्रीच्या सुमारास झालेल्या हत्येचा शेजाऱ्यापाजाऱ्यांना कुठलाही मागमूस लागू न देता या दोघांनी कृष्णा यांचा मृतदेह एका गोणीत भरून गोणी जवळच असणाऱ्या कोरड्या विहिरीत फेकून दिले. त्यानंतर या दोघांनी रात्रीतुन भिवंडीतून पळ काढला. मात्र देशात लॉकडाऊन असल्यामुळे पळून जायचे कुठे असा प्रश्न दोघांना पडला होता, अखेर दोघांनी परभणी येथे लता उर्फ ज्योती हिच्या गावी जाण्याचे ठरवून दोघे भिवंडीतून चालत चालत नाशिक राष्ट्रीय महामार्ग येथे आले तेथून त्यांनी जे वाहन मिळेल त्या वाहनाने परभणी गाठली. मात्र परभणीत येताच त्यांना परभणी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

१२ एप्रिल रोजी चाळ मालक कृष्णा हे बेपत्ता झाल्याची तक्रार मुलाने शांती नगर पोलीस ठाण्यात केली, कृष्णा यांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. कृष्णा हा बेपत्ता झाल्यापासून चाळीत राहणारी लता उर्फ़ ज्योती ही देखील बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि शैलेश म्हात्रे, अमोल मोरे आणि पथकाने लता उर्फ ज्योती हिच्या मोबाईलचे लोकेशन काढण्यात आले असता ते परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने परभणी येथे जाऊन लता उर्फ़ ज्योतीचा शोध घेतला असता ती आणि तिचा प्रियकर करणसिंग यांना परभणी येथील क्वारंटाईन कक्ष येथे क्वारंटाईन कऱण्यात आले होते. पोलीस पथकाने क्वारंटाईन कक्षाचे सर्व सोपस्कर पार पडून गुरुवारी दोघांना ताब्यात घेऊन भिवंडी येथे आले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मृतदेह विहिरीत फेकल्याचे पोलीसाना सांगितले.


चिंताजनक; बेस्टचे ८ कर्मचारी कोरोनाग्रस्त
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -