घरमुंबईइफिड्रीन ड्रग्ज सप्लाय करणार्‍या मुख्य आरोपीस अटक

इफिड्रीन ड्रग्ज सप्लाय करणार्‍या मुख्य आरोपीस अटक

Subscribe

ड्रग्ज फॅक्टरीचा मालक असल्याचे चौकशीत उघड

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत सुमारे तीन कोटी रुपयांच्या इफिड्रीन ड्रग्ज दोघांना विक्रीसाठी देणार्‍या मुख्य आरोपीस सोमवारी आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने हैद्राबाद येथून अटक केली. शंकर नरसैय्या मदयारला असे या 49 वर्षीय आरोपीचे नाव असून तो एका फॅक्टरीचा मालक असून याच फॅक्टरीमध्ये ड्रग्ज बनविले जात असल्याचे बोलले जाते. यापूर्वी शंकरला नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती.

या गुन्ह्यांत तो सध्या जामिनावर असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या वर्षी जोगेश्वरी परिसरात काहीजण ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती आंबोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी जोगेश्वरीतील अग्रवाल इस्टेट रोडवर साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद इस्माईल गुलाम हुसैन आणि दयानंद माणिक मुद्दानर या दोघांना अटक केली होती. यातील मोहम्म गुलाम हुसैन हा मूळचा हैद्रबादच्या रंगारेड्डी, सिकंदाराबाद, व्यंकटेश्वर नगरचा तर दयानंद मुद्दानर हा पालघर येथील वसईतील खोजा जमातखानाजवळील वसई कोळीवाडाचा रहिवासी आहे.

- Advertisement -

या दोघांकडून पोलिसांकडून पोलिसांनी तीन कोटी रुपयांचे 20 किलो 348 ग्रॅम वजनाचे इफिड्रीन ड्रग्ज, सुमारे पंधरा हजार रुपयांची कॅश, वाहनच चालविण्याचा परवाना आदी मुद्देमाल जप्त केला होता. पोलीस तपासात त्यांना ते ड्रग्ज शंकर मदयारला याने दिले होते. त्यामुळे त्याच्या मागावर पोलीस होते, त्याच्या अटकेसाठी आंबोली पोलिसांचे एक विशेष पथक हैद्राबाद येथे गेले होते, मात्र तो पळून गेला होता. दोन दिवसांपूर्वी त्याला मोबाईल लोकेशनवरुन या पथकाने हैद्राबाद येथून अटक केली. चौकशीत त्याला 17 फेब्रुवारी 2017 रोजी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. मात्र काही महिन्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने जामिन मंजूर केला होता.

जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा ड्रग्ज विक्री करण्यास सुरुवात केली होती. पोलीस तपासात त्याची कर्नाटकच्या चिकसुगूर, रायचून ग्रोथ सेंटरमध्ये व्हिनस केमिकल्स अ‍ॅण्ड ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीचा तो सर्वेसर्वा आहे. याच कंपनीत या अधिकार्‍यांनी यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा कच्चा मुद्देमालासह काही ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याच कंपनीत तो ड्रग्ज बनवित होता. त्याने मोहम्मद इस्माईल आणि दयानंद यांना तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि काही कॅश दिली होती. या दोघांवर मुंबईत या ड्रग्जची विक्रीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अटकेनंतर त्याला मंगळवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -