घरमुंबईकल्याण-डोंबिवली शहरात दिलासा

कल्याण-डोंबिवली शहरात दिलासा

Subscribe

कोरोना बाधितांची संख्या पाचशेहून तीनशेवर, एकाच दिवशी 381 जणांना डिस्चार्ज

कल्याण-डोंबिवली शहरात प्रतिदिन पाचशे कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात आता तो आकडा तीनशेवर आला असून मागील 24 तासात 342 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी 381 जणांना डिस्चार्ज दिल्याने एक कल्याण-डोंबिवलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीत 13 हून आरोग्य केंद्र असून प्रतिदिन 30 ते 50 कोरोना रुग्ण प्रत्येक आरोग्य केंद्र हद्दीत सापडत असल्याने रुग्णांची वाढ होत आहे. मागील 24 तासात 342 कोरोना रुग्ण आढळून आल्याने आता ती संख्या एकूण 17 हजार 773 झाली आहे. यात 5 हजार 696 रुग्ण उपचार घेत असून 11 हजार 11746 रुग्णांना डिस्चार्ज दिला असून मागील 24 तासात 381 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने कल्याण डोंबिवलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

यात 225 रुग्ण टाटा आमंत्रा आणि 9 रुग्ण आर. आर. रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शुक्रवारपर्यंत मृतांची संख्या 289 झाली आहे. मागील 24 तासात सर्वात जास्त डोंबिवली पूर्वमध्ये 342 रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात जास्त डोंबिवली पूर्वमध्ये 120 रुग्ण आढळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -