घरदेश-विदेशकर्मचार्‍यांना नोकरीवरून काढणार्‍या टॉप लीडरशिपकडे संवेदना कमी

कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढणार्‍या टॉप लीडरशिपकडे संवेदना कमी

Subscribe

कंपन्यांच्या टॉप लीडरशिपकडील संवेदना कमी झाली आहे. ज्या लोकांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यांनी स्वत:चे करिअर कंपनीसाठी दिले. त्यांना अशा संकटकाळी पाठिंबा देण्याऐवजी तुम्ही त्यांना बेरोजगार करत आहात, अशी टीका टाटा ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी केली आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात नोकरदार वर्गाचे टेन्शन प्रचंड वाढले आहे. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. रतन टाटा यांनी या क्षेत्रातील टॉप लीडर्सद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एका वेबसाईटला मुलाखत देताना रतन टाटा म्हणाले की, या काळात कार्पोरेट क्षेत्रातील टॉप लीडर्सचे कर्तव्य काय? तुमच्यासाठी नैतिकतेची व्याख्या काय? जे तुम्ही स्वत:च्या कर्मचार्‍यांशी अशा पद्धतीने वागत आहात. कोरोनाने आर्थिक संकट आल्यानंतर सर्व कंपन्यांनी कर्मचारी कपात केली; पण टाटा ग्रुप याला अपवाद ठरला. टाटा ग्रुपने फक्त वरिष्ठ व्यवस्थापनातील लोकांच्या पगारात २० टक्के कपात केली. टाटा ग्रुपने एकाही कर्मचार्‍याला काढून टाकले नाही.

- Advertisement -

व्यवसायात नफा कमावणे चुकीचे नाही; पण हे काम नैतिकतेने करणे गरजेचे आहे. तुम्ही नफा मिळवण्यासाठी काय करता हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. नफा कमावताना कंपन्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ते ग्राहक आणि शेअरधारकांसाठी काय व्हॅल्यू अ‍ॅड देत आहेत. सध्याच्या व्यवस्थापकांनी हा प्रश्न सातत्याने स्वत:ला विचारला पाहिजे की, जो निर्णय ते घेत आहेत ते खरंच बरोबर आहेत का?

ज्या कंपन्या स्वत:च्या लोकांबद्दल संवेदनशील नाहीत त्या भविष्यात कधीच टिकणार नाहीत. व्यवसायाचा अर्थ फक्त नफा कमावण्याचा नसतो. तुम्ही शेअरधारक, ग्राहक आणि कर्मचारी यांच्याशी जोडले गेले पाहिजेत. त्यांचे हित लक्षात घेतले पाहिजे, असे रतन टाटा म्हणाले. टाटा उद्योग समूहात विमान सेवा, हॉटेल, आर्थिक सेवा, ऑटो आदींचा समावेश होतो. ही अशी क्षेत्र आहेत ज्याच्यावर कोरोनामुळे सर्वाधिक परिणाम झालाय. विमान सेवा आणि हॉटेल व्यवसायातील परिस्थिती सर्वांना माहीत आहे. ऑटो सेक्टरची परिस्थिती अशीच असून गाड्यांच्या विक्रीत प्रचंड घट झाली आहे. असे असून सुद्धा टाटाने एकाही कर्मचार्‍याला नोकरीवरून काढून टाकले नाही.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी टाटा समूहातील आयटी कंपनी असलेल्या टीसीएसने चालू आर्थिक वर्षात ४० हजार लोकांना नोकरी देणार असल्याचे म्हटले होते. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार भरती करणार आहे. या कंपनीने फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील रोजगार देणार आहे. टीसीएस अमेरिकेत दोन हजार लोकांना काम देणार आहे. विशेष म्हणजे ही संख्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -