घरमुंबईमाहुलीच्या जंगलातील तलाव भरले

माहुलीच्या जंगलातील तलाव भरले

Subscribe

वन्यजीवांची तहान भागणार !

शहापूर तालुक्यातील माहूली परिसरातील पाणी टंचाई कायमची दूर करण्यासाठी वन्यजीव विभागाचे खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी पुढाकार घेतला होता. वासिंद येथील जेएसडब्लू कंपनीच्या मदतीने माहुली गडाच्या जंगलातील दोन तलावातील सुमारे 25 हजार मेट्रिक टन गाळ काढून तलावांची पाणी धारण क्षमता उन्हाळ्यात वाढविली होती. अखेर वन्यजीव विभागाची ही संकल्पना फळास आली असून उन्हाळ्यात कोरडेठाक पडलेल्या या तलावांना आता नवसंजीवनी मिळाली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे गाळ काढण्यात आलेली ही दोन्ही तलाव आता पाण्याने काठोकाठ भरली आहेत. या तलावाच्या पाण्याने उन्हाळ्यात वन्यजीव विभागाच्या जंगलातील पशुपक्षी वन्य प्राण्यांची तहान भागणार आहे.

- Advertisement -

उन्हाळ्यात गाळ काढल्याने आता माहुली जंगलातील तलावांत पाणी साठा चांगलाच वाढला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे तलावांमध्ये एकूण 25 हजार क्यूबिक लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे.
दर्शन ठाकूर, खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -