घरमुंबईरेल्वे गाड्यांची सफाई रामभरोसेच

रेल्वे गाड्यांची सफाई रामभरोसेच

Subscribe

साहित्य,वेतन देण्यासाठी रेल्वेकडे पैसे नाही

रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा रेल्वेने सुरू केला आहे. मात्र कंत्राटदार आणि रेल्वेच्या गलथान कारभारामुळे आज रेल्वे गाड्यांची दुुर्दशा आणि गरीब कंत्राट कामगारांची पिळवणूक होत आहे. मुंबई विभागातील रेल्वेच्या 400 पेक्षा जास्त रेल्वे कर्मचार्‍यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तर गाड्या सफाईसाठी देण्यात येणारे साहित्य मिळत नसल्यामुळे कंत्राटदार सफाई कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

रेल्वेच्या खासगीकरणाचे चटके रेल्वे स्थानकांवरील गरीब सफाई कर्मचार्‍यांना बसू लागले आहेत. सफाई कर्मचार्‍यांना रेल्वेतील खासगी कंत्राटदारांकडून वेतन, गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे खासगी रेल्वे सफाई कर्मचार्‍यांनी अधिकार्‍यांची भेट घेऊन याबद्दल तक्रार केली. मात्र कंत्राटदाराकडून सांगण्यात येत आहे की, रेल्वेने आम्हाला कंत्राटाचे वेळेत पैसे न दिल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे रेल्वेच्या आणि कंत्राटदारांच्या भांडणात गरीब कंत्राटी कर्मचारी पिळला जात आहे.

- Advertisement -

दोन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची पाळी आली आहे. काही दिवसांपूर्वी या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावर अस्वच्छता आणि रेल्वे गाड्या विना सफाईने चालविण्याची नामुष्की रेल्वेवर ओढवली होती. सध्या मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, माजगाव, वाडीबंदर आणि दादर या ठिकाणी 400 पेक्षा जास्त खासगी कंत्राटदाराचे सफाई कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्याबरोबर रेल्वेचेही सुध्दा कर्मचारी सफाई कर्मचारी सुध्दा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी कर्मचारी वेतन न मिळाल्यामुळे कामाचा बोजा आता रेल्वे कर्मचार्‍यांवर आला आहे.

रेल्वेच्या सफाई कर्मचार्‍यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे. याला रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदार जबाबदार आहे. कर्मचार्‍यांचे वेतन येत्या दोन दिवसांत मिळाले नाही, तर आम्ही मध्य रेल्वेच्या विरोधात बेमुदत आंदोलन करू.-अमित भटनागर,उपाध्यक्ष , सेंट्रल रेल्वे मजदूर संघ 

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -