घरमुंबईमाहिम स्थानकाजवळ रेल्वे रूळावरून घसरली; सेवा विस्कळीत

माहिम स्थानकाजवळ रेल्वे रूळावरून घसरली; सेवा विस्कळीत

Subscribe

माहिम स्थानकाजवळ ही लोकल ट्रेन घसरल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत

सीएसएमटी-वांद्रे या लोकल ट्रेनचे चाक घसरल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ११.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. सीएसएमटी-वांद्रे ही लोकल वांद्रे या दिशेकडे येत होती. त्यावेळी ही लोकल ट्रेन रूळांरून माहिम स्थानकाजवळ घसरली. माहिम स्थानकाजवळ ही लोकल ट्रेन घसरल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

गांधी जयंतीच्या निमित्ताने आज सुट्टी असल्याने लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. यामुळे सुदैवाने कोणीही प्रवासी जखमी झाले नसल्याची माहिती मिळत आहे. अंधेरी-सीएसएमटी, अंधेरी-पनवेल हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गाची वाहतूक पुढच्या सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -