घरताज्या घडामोडीहातावरील टॅटूमुळे पकडला गेला मूकबधिर चोर

हातावरील टॅटूमुळे पकडला गेला मूकबधिर चोर

Subscribe

विजय सेल्स या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी एका मुकबधिराला अटक केली आहे. उजव्या हाताच्या टॅटू वरून या चोराची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.

तुषार (वय ३०) या चोराचे नाव आहे, तुषार हा मूकबधिर असून मूळचा गोवा येथे राहणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ३० जून रोजी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील विजय सेल्स या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानाची पहिल्या मजल्यावरील काच फोडून ८ महागडे मोबाईल फोनची चोरी झाली होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

तपासात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळले होते. परंतु चोराने चेहरा रुमालाने झाकल्यामुळे त्याची ओळख पटत नव्हती, मात्र चोराच्या उजव्या हातावरील टॅटूमुळे चोराचा शोध घेऊन ठाणे परिसरातून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी दिली.

अटक करण्यात आलेला चोर मूकबधिर आल्यामुळे त्याच्याकडे गुन्ह्याची उकल काशी करावी हा प्रश्न पोलिसांना पडला होता. अखेर पोलिसांनी त्यांच्या भाषेतील दुभाषक शिक्षकाची मदत घेऊन मूकबधिर चोराला इशाऱ्यावरून बोलता करता आले. या चोराने स्वतःचे नाव तुषार आणि राहणार गोवा येथील असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीतील ८ मोबाईल पैकी ४ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्याचा सखोल तपास वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वपोनि. दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विजय मुतडक,सपोनि. रवींद्र फड आणि पथक यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -