घरमुंबईसत्तेत नसलो तरी मत्स्यशेती व्यावसायिकांचे प्रश्न सोडवू - शरद पवार

सत्तेत नसलो तरी मत्स्यशेती व्यावसायिकांचे प्रश्न सोडवू – शरद पवार

Subscribe

सिंधुदुर्गात जशी पर्यटन, फलोत्पादनावर चर्चा होते तशीच मत्स्यशेतीवरही चर्चा होऊ शकते. या जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्याची ताकद या तिन्ही घटकात आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत नसलो तरी मत्स्यशेती व्यवसायातील उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यास राज्य शासनाला आग्रहाची भूमिका घेण्यास लावू, असे मत शरद पवार यांनी मांडले.

सिंधुदुर्गात जशी पर्यटन, फलोत्पादनावर चर्चा होते तशीच मत्स्यशेतीवरही चर्चा होऊ शकते. या जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्याची ताकद या तिन्ही घटकात आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत नसलो तरी मत्स्यशेती व्यवसायातील उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यास राज्य शासनाला आग्रहाची भूमिका घेण्यास लावू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी सोमवार, ३ डिसेंबर रोजी देवली येथे मांडले. जिल्हा दौर्‍यावर आलेल्या शरद पवार यांनी आज सकाळी देवबाग येथून बोटीने सफर करत देवली येथील उदय अ‍ॅक्वा फार्म या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी पवार यांनी कोळंबी प्रकल्पाची पाहणी करत घेतलेल्या उत्पन्नाची माहिती घेतली.

वाचा : राणेंच्या घरी पोहचले पवार; चर्चांना उधाण

- Advertisement -

जिल्हा बँकेने केले अर्थसाह्य

यावेळी पवार म्हणाले की, देवली येथील उदय अ‍ॅक्वा फार्मने कोळंबी प्रकल्प सुरू केल्यानंतर हा प्रकल्प यशस्वी होईल का, अशी शंका होती. मात्र व्हिक्टर डांटस यांच्या सहकार्याने ही शंका दूर झाली. चांगले सीड तसेच आवश्यक ती काळजी घेतली आणि मार्केटिंगची चांगली व्यवस्था झाल्यास आपण यशस्वी होऊ शकतो हे सिद्ध केले आहे. आता हे सिद्ध झाल्यावर सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या जमिनी शेतीला उपयुक्त नसतील अशा खारलँडच्या जमिनी असतील तर त्या यशस्वी उद्योजक पुढे येत आहेत त्यांना द्यायला हव्यात. जिल्हा बँकेने त्यांना अर्थसाह्य करण्याची चांगली भूमिका घेतली आहे. अशीच भूमिका राज्य सरकारने घेतली तर हा व्यवसाय निश्‍चितच वाढेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीत?

मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे आहे ते नागपूर येथे हलविण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा मत्स्य व्यवसायच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे ते हलवू नये. शिवाय कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विद्यापीठ देण्यात यावे, अशी मागणी मत्स्य महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आली. याप्रश्‍नी सरकारचे लक्ष वेधू, असे पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

वाचा : राम मंदिराच्या मुद्यावरून शरद पवारांची सरकारवर टिका

कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीची निर्णय चिंताजनक

शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे प्रश्न पडत आहेत. त्यामुळे आता मालाला मार्केट मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र शासनाने आता कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय चिंताजनक वाटत आहे. या बाबत आत्ताच बोलणे योग्य नाही मात्र सहा महिन्यात याचे परिणाम दिसून येतील परंतू शेतकऱ्यांसाठी हा निर्णय फायदेशीर होईल असे वाटत नाही असा सुचक सल्लाही शरद पवार यांनी वेंगुर्ला येथे दिला.

आंबा बागायतदार मंच्याच्या चर्चासत्रात सहभागी 

वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रात आंबा बागायतदार मंच्याच्या चर्चासत्रात पवार बोलत होते. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी शेतीबागायती मधून केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो होतो. या दरम्यान आपणा सर्वांबरोबर झालेली चर्चा पाहता हे सर्व मुद्दे मी सोडवू शकत नाही, कारण मी सध्या सत्तेत नाही. परंतू ते कुठे पोहचवायचे आहेत ते मला माहित आहे. त्यामुळे ते नक्की पोहचवेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -