घरमुंबईगोरेगाव येथील आरे जंगलात भीषण आग

गोरेगाव येथील आरे जंगलात भीषण आग

Subscribe

मुंबईमधील हरितपट्टा म्हणून ओळखला जाणाऱ्या गोरेगाव येथील आरेच्या जंगलात आज संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरेमधील अरुण कुमार वैद्य मार्गाजवळील इन्फिनिटी आयटी पार्क येथे ही आग लागली होती. आग लागलेले ठिकाण हे आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नजीक असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या संध्याकाळी ६.२८ वाजता घटनास्थळी पोहोचल्या. त्याचबरोबर वनाधिकारीसुद्धा या ठिकाणी पोहोचले होते. आतापर्यंत या आगीत कुणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेले नसून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आरे कॉलनीला मुंबईचे फुस्फुस मानले जाते. आरेमधील जंगलाचे संवर्धन होण्यासाठी अनेक पर्यावरणवादी काम करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -