घरCORONA UPDATECoronaVirus: महापालिकेच्या आपत्कालिन कक्षात आणखी तीन कोरोनाग्रस्त

CoronaVirus: महापालिकेच्या आपत्कालिन कक्षात आणखी तीन कोरोनाग्रस्त

Subscribe

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातील दोन कामगारांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीमध्ये अजून तीन जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे तिन्ही कामगार हाऊस किपिंग करणारे कामगार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयातच एकूण पाच कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळून आले असून एरव्ही एखाद्या इमारतीमध्ये एक जरी रुग्णालय आढळून आला तर संपूर्ण इमारत सिल केली जाते. परंतु महापालिका मुख्यालयात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळूनही मुख्यायालयातील कारभार सुरुच आहे.

गेल्या सोमवारी महापालिका मुख्यालयातील मुख्य आपत्कालिन नियंत्रण कक्षातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांना अंधेरीतील सेव्हन हिल्समध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून त्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये अजून तीन कामगारांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. हे तिन्ही कामगार हाऊस किपिंग संदर्भातील कामगार असून त्यांना वरळीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

- Advertisement -

दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर येथील दुसऱ्या कामगारांची एक फळी तयार करून परेल येथील कल्पतरु इमारतीतील असलेल्या आपत्कालिन नियंत्रण कक्षात कार्यरत करण्यात आली आहे. कोरोनाचा नियंत्रण कक्षही आता तिथूनच चालवला जात असून राज्य सरकारने नेमलेले समन्वयकही आता तिथे बसूनच काम करत आहे.

‘एस’ विभागातील कामगाराला कोरोनाची बाधा

महापालिकेच्या एस विभाग कार्यालयात घनकचरा व्यवस्थापन खात्यातील एका लिपिक वर्गातील कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील सर्व कामगार आणि कर्मचारी यांची चाचणी करण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत पहिले दोन मजले कामकाजासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तर उर्वरीत विभाग कार्यालय सुरु आहेत. आतापर्यंत दोन सफाई कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका सफाई कामगाराच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

महापौर निवासातही कामगाराला कोरोनाची बाधा

मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलेले असतानाच महापौर निवासातील सर्वच कामगारांसह इतरांची कोरोना कोविड १९ ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये महापौर निवासातील एका देखभाल व दुरुस्ती विभागाच्या एका कामगाराला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. हा कामगार धारावी येथे राहणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा –

देशभरात आजपासून दुकाने उघडणार; मॉल्स, मद्य विक्रिची दुकाने मात्र बंदच राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -