घरमुंबईई-नाम पद्धतीविरोधात व्यापारी आक्रमक; मंगळवारी बंदची हाक!

ई-नाम पद्धतीविरोधात व्यापारी आक्रमक; मंगळवारी बंदची हाक!

Subscribe

ई-नाम पद्धतीविरोधात सरकारवर दबाव टाकण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. यात एकूण १३ व्यापारी आणि माथाडी संघटना सहभागी होणार आहेत.

राज्यातल्या व्यापार पद्धतीमध्ये सूसूत्रता यावी म्हणून राज्य शासनाने व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी नाम पद्धती लागू केली आहे. मात्र ‘या प्रक्रियेमुळे व्यापाऱ्यांसह, शेतकरी आणि खरेदीदार यांचे नुकसान होणार असून त्याचा मोठा परिणाम आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मार्केटवर होण्याची शक्यता आहे‘, असं सांगत व्यापारी वर्गाने बंदची हाक दिली आहे. याबाबत व्यापाऱ्यांचा शासनाशी पत्रव्यवहार सुरू असून माजी कृषी मंत्री शरद पवार यांनाही मध्यस्थी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी साकडे घातले आहे. यासंदर्भात सरकारवर दबाव टाकण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्यात येणार आहे. यात एकूण १३ व्यापारी आणि माथाडी संघटना सहभागी होणार आहेत. एपीएमसी मार्केटजवळच्या मंदिर गेटजवळ जमल्यावर मोर्चा काढण्यात येणार असून मार्केट १ येथे मोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे.

हा व्यापारी वर्गाला संपवण्याचा डाव

व्यापारी वर्गाकडून बंदचे आवाहन करताना सरकारवर विविध आरोप केले गेले आहेत. यात सन २०१८चा महाराष्ट्र शासन अध्यादेश क्रमांक २४ मधील सर्वात मोठी अडचण नाम पद्धती ठरत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच या नाममध्ये व्यापारी वर्गाला बाजूला ठेवले गेले आहे. कालांतराने व्यापारी वर्ग संपवण्याचा हा डाव आहे, असा गंभीर आरोप सरकारवर करण्यात आला आहे. व्यापारी वर्गांनी सरकारला केलेली १००% नियमन मुक्तीची मागणी मान्य होत नसल्याचे इथल्या व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

माथाडी कामगारांची हमाली बुडणार

‘सर्व नवीन नियमनाचा व्यापारावर परिणाम होऊन त्यात माथाडी बंधूंची हमाली बुडणार आहे. पर्यायाने माथाडी वर्गावर मोठे संकट कोसळणार आहे’, असे सांगत सरकारच्या या अन्यायाविरुद्ध उभे ठाकण्यासाठी मंदिर गेट जवळ जमण्याचे व मोठ्या संख्येने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्यापारी संघटनेकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -