घरमुंबईविहिंप, अयोध्या आणि राज ठाकरेंचं नवीन व्यंगचित्र!

विहिंप, अयोध्या आणि राज ठाकरेंचं नवीन व्यंगचित्र!

Subscribe

उद्धव ठाकरेंची अयोध्या वारी आणि विहिंपच्या हुंकार रॅलीमध्ये मोहन भागवतांचा राम मंदिरासाठीचा हुंकार या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढून या सगळ्या प्रकारावर खोचक टिप्पणी केली आहे.

बातमीचं शीर्षक वाचून तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हा काय प्रकार आहे. असा काही संबंधि अद्याप कुठेही चर्चेत आलेला नाही. आत्तापर्यंत विहिंप, भाजप, उद्धव ठाकरे आणि राम मंदिर असंच काहीसं गणित चर्चेत राहिलं आहे. पण त्यामध्ये अचानक राज ठाकरे कुठून आले? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अयोध्या आणि उद्धव ठाकरेंशी राज ठाकरेंनी स्वत:च हा संबंध प्रस्थापित केला आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि विश्व हिंदू परिषदेच्या हुंकार रॅलीमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या राम मंदिराच्या मुद्द्यावर त्यांच्या खास शैलीमध्ये टोला लगावला आहे. राज ठाकरेंची खास शैली म्हणजे अर्थातच त्यांचं व्यंगचित्र!

व्यंगचित्रातून केली खोचक टिप्पणी!

ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेसराष्ट्रवादीच्या विरोधकांवर ७ व्यंगचित्रांच्या मालिकेमधून शेलक्या शब्दांमध्ये तोंडसुख घेणाऱ्या राज ठाकरेंनी आता अयोध्या आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर या सगळ्यांना धारेवर धरलं आहे. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा, भाजपकडून केलं जाणारं राम मंदिराचं समर्थन आणि विश्व हिंदू परिषदेच्या नागपूरच्या हुंकार रॅलीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेला राम मंदिराचा हुकार या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी त्यांच्या व्यंगचित्रामध्ये खोचक टिप्पणी केली आहे.

- Advertisement -

भगवान रामांनीच विचारला सवाल!

या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी स्वत: भगवान राम आणि भ्राता लक्ष्मण यांना दाखवलं आहे. स्वत: भगवान राम विहिंप, भाजप आणि उद्धव ठाकरेंना सवाल करत असल्याचं या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी रेखाटलं आहे. ‘अरे, देश घातला खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात?’ अशा शब्दांमध्ये राम या तिघांना दरडावत असल्याचं या व्यंगचित्रात दिसत आहे. तसंच, ‘अरे, लोकांनी तुमच्याकडे रामराज्यमागितले होते, ‘राममंदिरनव्हे‘! अशी खंत देखील राम व्यक्त करत असल्याचं दिसत आहे.

Raj Thackeray Cartoon on Ram Temple in Ayodhya
राज ठाकरेंचे अयोध्या प्रश्नावर व्यंगचित्रातून फटकारे

आणि भाजप कुटतेय टाळ!

दरम्यान, एकीकडे राम या तिघांना झापत असतानाच या तिघांचं मात्र भलतंच चाललं आहे. विश्व हिदू परिषद हसत दोन्ही हात वर करून उभी आहे, तर उद्धव ठाकरे तिकडे कोणतातरी नारा देत आहेत असं या व्यंगचित्रात दिसत आहे. त्याचवेळी, भाजपा मात्र टाळ कुटत असताना दाखवल्यामुळे राज ठाकरेंचा हा घाव भाजपच्या वर्मी लागण्याची शक्यता आहे.


हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? – राज ठाकरेंना भाजपचे व्यंगचित्रातून उत्तर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -