घरमुंबईवाहतूक महिला पोलिसांचे वाहन चालकांबरोबरच रक्षाबंधन  

वाहतूक महिला पोलिसांचे वाहन चालकांबरोबरच रक्षाबंधन  

Subscribe

दादा नियमांचे रक्षण कर, उल्लंघन करू नको असे सांगत महिला वाहतूक पोलिसांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत वाहन चालकांनाच राख्या बांधल्या. रविवारी सकाळी पनवेल नानासाहेब धार्माधिकारी उड्डाणपुलाच्या खाली सिग्नलजवळ वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांना रजनी पाळंदे या महिला वाहतूक पोलिसाने राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

दादा नियमांचे रक्षण कर, उल्लंघन करू नको असे सांगत महिला वाहतूक पोलिसांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत वाहन चालकांनाच राख्या बांधल्या. रविवारी सकाळी पनवेल नानासाहेब धार्माधिकारी उड्डाणपुलाच्या खाली सिग्नलजवळ वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांना रजनी पाळंदे या महिला वाहतूक पोलिसाने राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. बहीण भावाला राखी बांधून ज्याप्रकारे भावाकडून रक्षणाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांनी वाहनचालकाना राख्या बांधून नियमांचे रक्षण आणि उल्लंघन करू नये यासाठी प्रेरित केले.

वाहतुकीचे उल्लंघन करणे हा आपल्या भारताच्या समाजजीवनाचा स्थायीभाव..संधी मिळेल तेथे आपले वाहन; मग ती सायकल असो वा दुचाकी अथवा चारचाकी वाहन.. प्रत्येकाला आपले वाहन पुढे नेण्याची कायम घाई आणि त्या घाईचा परिणाम म्हणजे वाहतुकीचे नियम बेधडकपणे मोडून पुढे जाणे ही बाब आपण नेहमी बघतो. पोलिसांनी पकडल्यानंतर ‘तोडपाणी’ करणे किंवा त्याच्याशी हुज्जत घालून आपण कसे चुकीचे नाही, हेही पटविण्याचा प्रयत्न करणे नित्याचे आहे. मात्र पनवेल शहर वाहतूक पोलीस, पनवेल शहर पोलीस ठाणे आणि पत्रकार मित्र असोशिएशन यांच्या विध्यमाने पनवेल वाहतूक शाखेचे रजनी रजनी पाळंदे महिला पोलिसांनी मात्र रविवारी राखी पौर्णिमेचे औचित्य साधत अशा प्रकारे नियम मोडणार्‍या चालकांना कोणतीही शिक्षा न करता, दंडाची पावती न फाडता वाहतुकीचे नियम मोडणार्‍या अशा चालकांना चक्क राखी बांधून त्यांना वाहतुकीचे नियम ‘वेगळ्याच प्रकारे’ ‘समजावून’ सांगितले.

- Advertisement -

लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल सजगता उत्पन्न व्हावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाचा वाहने चालविणार्‍यांवर सकारात्मक परिणाम होईल. 
-अभिजित मोहिते –  वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक 

मी आज दुचाकी चालविताना हेल्मेट घातले नाही. हा माझा गुन्हा आहे. मात्र या पुढे दुचाकी चालविताना नेहमी माझ्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करिन. मला कोणीही बहीण नसल्यामुळे रक्षाबंधन सण मला माहीतही नाही. मात्र  रजनी पाळंदे या महिला वाहतूक पोलिसानी राखी बांधून मला बहिणीची माया दिली.
-पंकज शुक्ला, वाहन चालक 

- Advertisement -

मी पोलीस खात्यामध्ये काम करीत असताना मला सख्खा भाऊ नसल्यामुळे रक्षाबंधना दिवशी मी कधीही सुट्टी घेत नाही. मात्र वाहतूक शाखा, शहर पोलीस व पत्रकार मित्र यांच्या या आजच्या कार्यक्रमामुळे नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना राखी बांधून प्रत्यक्ष रक्षाबंधन सण साजरा केला आहे.
रजनी पाळंदे – महिला वाहतूक पोलीस, पनवेल शहर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -