घरताज्या घडामोडीउल्हासनगर: जिम ट्रेनरचा रेल्वे अपघातात मृत्यू

उल्हासनगर: जिम ट्रेनरचा रेल्वे अपघातात मृत्यू

Subscribe

उल्हासनगर कॅम्प नंबर चारमधील सुभाष टेकडी चौकामध्ये असणाऱ्या जॉली जिमच्या कोचचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी उल्हासनगर व अंबरनाथ स्थानकाच्या दरम्यान घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या कोचचे नावं प्रशांत कांबळे ऊर्फ जॉली असून त्याच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात व जॉलीच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम शिकणाऱ्या तरुणात शोककळा पसरली आहे.

प्रशांत विवाहित होता. त्याला अडीच वर्षाचा मुलगा असून प्रशांतच्या मृत्यूने त्याची पत्नी विधवा व मुलगा पोरका झाला आहे. प्रशांतला अखेरचा निरोप देताना आजी माजी नगरसेवक, समाजसेवक, नागरिक, व्यायाम करणारे तरुण मोठया संख्येने उपस्थित होते. प्रशांतच्या आकस्मिक मृत्यूची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – पाळीव कुत्रा सारखा भुंकायचा म्हणून शेजाऱ्याने कुत्र्याच्या मालकीणीचा खून केला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -