घरताज्या घडामोडीपाळीव कुत्रा सारखा भुंकायचा म्हणून शेजाऱ्याने कुत्र्याच्या मालकीणीचा खून केला

पाळीव कुत्रा सारखा भुंकायचा म्हणून शेजाऱ्याने कुत्र्याच्या मालकीणीचा खून केला

Subscribe

एका पाळीव कुत्र्याच्या ओरडण्यामुळे मालकिणीचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे.

एका पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यामुळे मालकिणीचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. यामध्ये डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील एका चाळीत राहणाऱ्या नागम्मा शेट्टी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाळीव कुत्रा सतत ओरडत असल्याने आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. यावरुन त्या महिलेची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील एका चाळीत राहणाऱ्या नागम्मा शेट्टी या महिलेकडे एक पाळीव कुत्रा होता. मात्र हा कुत्रा सतत ओरडत असल्यानं आम्हाला त्रास होत असल्याची शेजाऱ्यांची तक्रार होती. यावरून सोमवारी रात्री नागम्मा आणि तिच्या शेजाऱ्यांमध्ये वाद झाले. यानंतर शेजारच्या चार महिलांनी मिळून नागम्माला मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी साधी एनसीदेखील नोंदवून घेतली नव्हती. महिलेच्या मुलींनी  भाजपच्या महिला ग्रामीण शहराध्यक्ष मनीषा राणे यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली. मनीषा राणे यांनी पोलिसांना जाब विचारलयानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला तब्बल २४ तासांनी सुरुवात केली. मात्र अद्याप याप्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा – कपडे बदलताना टेलर काढायचा तरूण मुलींचे व्हीडिओ, पोलिसांनी केली अटक!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -