घरमुंबईराज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्यातील चार आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

Subscribe

राज्यातील अन्य चार आयपीएस अधिकार्‍यांच्या गुरुवारी गृहविभागाने बदल्या केल्या आहेत. त्यात निखिल गुप्ता यांची औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी तर के. एम. एम. प्रसन्ना यांची औरंगाबाद परिक्षेत्रच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बुधवारी राज्य पोलीस दलातील 45 आयपीएस अधिकार्‍यांच्या गृहविभागाने बदल्या केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पुन्हा चार पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेल्या निखिल गुप्ता यांची औरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी, औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रविंद्र सिंघल यांची निमंत्रक, वैद्यमापन शास्त्र विभाग तसेच के. एम. एम. प्रसन्ना यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी काळात इतर काही अधिकार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -