घरमुंबईठाण्यातील सनदी अधिकार्‍यांना बदल्याचे वेध

ठाण्यातील सनदी अधिकार्‍यांना बदल्याचे वेध

Subscribe

म्हाडा प्राधिकरणाला  मिळणार नवा अध्यक्ष

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सर्वच सनदी अधिकार्‍यांना बदलीने ग्रासले असतांना ठाणे जिल्ह्यातील आयएएस व आयपीएस अधिकार्‍यांनाही आता बदलीचे वेध लागले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये ठाण्याचे कलेक्टर व ठाण्याचे कमिश्नर कोण होणार, याची जिल्ह्यातल्या नागरिकांना उत्सुक्ता लागून राहिली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी तर आयुक्तपदाचा रेकॅार्डब्रेक केला आहे. ठाणे महापालिका आयुक्तपदी जैस्वाल हे ३ जानेवारी २०१५ रोजी रुजू झाले होते.आता त्यांना आयुक्तपदी राहून तब्बल पाच वर्षे उलटून गेली आहेत. भाजपा सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील सनदी अधिकारी अशी जैस्वाल यांची ज्येष्ठ सनदी अधिकार्‍यांमध्ये ओळख होती. जैस्वाल यांनी ठाण्यात कामही स्वतंत्र बाण्याने केले.

- Advertisement -

अर्थात फणसाळकर यांनी ठाण्याचा काऱभार सर्वांना बरोबर घेऊन केला असल्याने त्यांच्याबाबत ठाणेकरांमध्ये तक्रारीचा सूर नाही. त्यांनी याआधीही ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी काम केले असल्याने फणसाळकर यांना ठाण्यात काम करण्याचा पूर्वानुभव चांगलाच होता. त्यामुळे ते ठाणेकरांमध्ये मिसळून काम करू शकले.

ठाण्याचे कलेक्टर राजेश नार्वेकर यांनी १४ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा ठाण्यातील २ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अद्याप ७ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, सत्तांतराचा फटका हा अन्य अधिकार्‍यांप्रमाणे नार्वेकरांनाही बसण्याची शक्यता अधिक आहे. कारण ठाकरे सरकारमध्ये महसूल खाते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. त्यामुळे नार्वेकर यांना नवे महसूलमंत्री त्यांचा कालावधी पूर्ण करू देतात की त्यांची त्या आधीच बदली होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात नवी विटी नवा दांडू याप्रमाणे नार्वेकर मुदतीआधीच जातात की काय याकडे ठाणेकरांमध्ये उत्सुकता आहे. कल्याण-डोंबिवलीचे महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनाही बदलीचे वेध लागले असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने बोडके यांना राज्यात कुठे नवी संधी मिळते याकडे नजरा लागल्या आहेत. अर्थात बोडके यांच्या कल्याण-डोंबिवलीतील कारभाराबाबत सर्वसामान्य फारसे समाधानी नसल्याचे चित्र असल्याने त्यांच्याबाबत ठाकरे सरकार कोणता निर्णय घेते याबाबतही साशंकता आहे.

- Advertisement -

राज्यभरातील सभापतींच्या नियुक्त्या रद्द

महाविकास आघाडी सरकारमधील खातेवाटप होऊन मंत्रिमंडळाचा कारभार जसा सुरळीत सुरू झाला, तसे आता महामंडळांवरील राजकीय नियुक्त्यांंवर लक्ष केंद्रित झाले आहे. ऊर्जा विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या राज्यभरातील मंडळामधील सभापतींच्या बदल्या करण्याचे परिपत्रक गृहनिर्माण विभागाकडून जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या परिपत्रकात म्हाडा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची नियुक्तीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच म्हाडाला नवीन अध्यक्ष मिळणार, हे स्पष्ट झाले आहे.

बदल्या अपेक्षित होत्या-मधू चव्हाण

नवीन सरकार अस्तित्वात आल्याने महामंडळावरील नियुक्या रद्द होणार हे अपेक्षितच होते. या नियुक्त्या रद्द होणार हे कळलेच होते. नियुक्त्या रद्द करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत, अशी कुणकुण लागली होती, पण अजूनही आमच्यापर्यंत कोणतेही औपचारिक परिपत्रक आलेले नाही, अशी प्रतिक्रिया म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -