घरमुंबईट्रान्सफॉर्मर चोरी झाल्याने गावकरी अंधारात

ट्रान्सफॉर्मर चोरी झाल्याने गावकरी अंधारात

Subscribe

विरार पूर्वेकडील बावखल गावातील ट्रान्सफॉर्मरची नासधूस करून चोरट्यांनी शुक्रवारी ट्रान्सफॉर्मरमधील महत्वाचे भाग चोरून नेले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथील शंभर गावकर्‍यांना अंधारात रहावे लागत आहे. विरार पूर्व कण्हेर पोलीस चौकीच्या हद्दीत बावखल गाव आहे. जवळपास शंभरहून अधिक कुटुंबे यागावात वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गावातील एकमेव ट्रान्सफॉर्मरची नासधूस केली. तसेच त्यामधील वस्तू चोरून नेल्या. ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने वीज पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून खंडीत झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. याचा फटका लहान मुलांसह महिला, वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरणचे अधिकारी नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी चालढकल करत असल्याने अजून किती दिवस आम्ही अंधारात राहायचे? असा सवाल गावकरी करीत आहेत. या प्रकाराबाबत महावितरण अधिकार्‍यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रान्सफॉर्मर लावून देणार असल्याचे सांगितले. मात्र कधी लावणार? हे न सांगितल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -