घरमुंबईएसटी बससाठी गावकर्‍यांचे श्रमदान

एसटी बससाठी गावकर्‍यांचे श्रमदान

Subscribe

माळघर दापटी ते वावर वांगणी हा रस्ता खराब झाल्याचे कारण सांगत, एसटी महामंडळाने वावर वांगणी सरपंचांना पत्र पाठवून एसटी बंद करीत असल्याची माहिती दिली. मात्र एसटी बंद होऊन नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून या परिसरातील नागरिकांनी एक दिवस श्रमदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले.

खंडीपाडा माळघर ते वावर वांगणी या 13 किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापूर्वी पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आले आहे. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणे अजूनही ठेकेदाराचीच जबाबदारी आहे. मात्र ठेकेदार वावर वांगणी रस्त्याचे काम केल्यानंतर फिरकला सुद्धा नाही. या रस्त्यावर मोठं मोठाले खड्डे पडून काही ठिकाणी रस्त्यावरील मोर्‍या तुटून रस्ता तुटला आहे.

- Advertisement -

त्यामुळे एसटी बस चालकांना त्रास आणि धोक्याचे होत असल्याचे सांगत एसटी बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. एसटी बंद होवून याभागातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची, कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाची किंवा ठेकेदाराची वाट न पहाता गावकर्‍यांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे भरले.

वावर वांगणी भागात जवळपास 15 गावे असून, नाशिक जिल्हातील काही गावे, तसेच सिल्वासा आणि गुजरातचा भाग लागून असल्याने त्या परिसरातील नागरिकांना रुणांना किंवा बाजार करण्यासह सगळ्याच कामासाठी जव्हार हीच बाजारपेठ जवळ पडत आहे. त्यामुळे एसटी ही या भागातील नागरिकांसाठी सोयीची आहे. मात्र खराब रस्त्याच्या कारणास्तव एसटी बंद पडली असती तर अनेकांची गैरसोय झाली आहे. सरपंच विजय शिंदे, उप सरपंच यशवंत बुधर, जि. प.सदस्य रतन बुरु यांनी पुढाकार घेऊन गावकर्‍यांच्या मदतीने श्रमदा केले आणि एसटी सेवा सुरु ठेवण्याचे काम केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -