घरमुंबईस्वस्तात कार देतो सांगत लाखोंचा गंडा

स्वस्तात कार देतो सांगत लाखोंचा गंडा

Subscribe

स्वस्तात ईनोव्हा कार मिळवून देतो, असे आमिश दाखवून एका एजंट मालकाने एका व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एजंट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुला स्वस्तात ईनोव्हा कार मिळवून देतो, असे मिश दाखवून एका भामट्या एजंटने शहरातील आसबीबी रोडवरील प्रवासी सुमो चालकाला सव्वा लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या फसवणुकीप्रकरणी भामट्या एजंटच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरहान शालेह मोहम्मद शेख उर्फ राजू शेख (३८) असे फसवणूकीचा गुन्हा दाखल झालेल्या भामट्या वाहन एजंटचे नाव आहे.

नेमके काय घडले?

माहिम येथील सुलतान चाळ याठिकाणी राहणारा भामट्या वाहन एजंट फरहान शालेह मोहम्मद शेख यांने भिवंडी शहरातील प्रवासी सुमो चालक रमजान अहमद सिद्दीकी (५०) यांना स्वस्तात ईनोव्हा कार मिळवून देतो, असे सांगून एमएच – ०२ – एवाय -९३५० हि कार भिवंडीत दाखवण्यास आणून तिचा पावणे दोन लाखात सौदा केला. या सौद्यापोटी त्याने चेक आणि बँक ट्रॅन्जेक्शनच्या माध्यमातून १ लाख २५ हजार रुपये उकळले. त्यानंतर रमजान सिद्दीकी हे उरलेले पैसे घेऊन गाडीचा ताबा घेण्यासाठी माहिम येथे आले असता त्यास गाडीचा ताबा देण्यास नकार देऊन गाडी आणि पैसे देखील परत देणार नाही, असे एजंट मालकांने सांगितले. तसचे पैसे परत मागशील तर मारून टाकीन अशी धमकी देखील फरहान याने दिली आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुमो चालकाने शहर पोलीस ठाण्यात वाहन एजंट फरहान याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार सुरेश चौघुले करीत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – स्वयंपाकाच्या कारणावरुन विवाहितेची आत्महत्या

 हेही वाचा – भिवंडीतून दोन मालवाहू ट्रकची चोरी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -