घरदेश-विदेशदिवाळीचे रेल्वे रिझर्वेशन आताच संपले; मोठी प्रतीक्षा यादी

दिवाळीचे रेल्वे रिझर्वेशन आताच संपले; मोठी प्रतीक्षा यादी

Subscribe

उन्हाळ्याच्या सुटी संपून काही दिवसही लोटत नाही तोच प्रवाशांना आता दिवाळीच्या उत्सवाचे वेध लागले आहे. परिणामी रेल्वेचे रिझर्वेशन आतापासूनच संपले असून मोठ्या प्रतिक्षा यादीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. आरक्षण संपण्याचा हा प्रकार रेल्वेच्या लखनौ विभागात घडला आहे. लखनौ मेलसह बऱ्याच नियमित गाड्यांसाठी आतापासूनच भली मोठी वेटींग लिस्ट आहे. दिवाळीचा उत्सव यावर्षी 27 ऑक्टोबर रोजी आहे.

लखनऊ विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की कैफीयत एक्सप्रेसच्या थर्ड एसी क्लास श्रेणी ‘रिग्रेट’ झाली आहे. याशिवाय शताब्दी एक्स्प्रेस आणि लखनौ मेलसह अनेक गाड्यांचे रिझर्वेशन संपले असून प्रतीक्षा यादी मोठी आहे. एसी एक्सप्रेसच्या थर्ड एसीच्या प्रतीक्षा यादीत आतापासूनच २०० लोक आहेत. मुंबईहून येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये स्लीपर श्रेणीत 200 पेक्षाही जास्त वेटिंग लिस्ट आहे.

- Advertisement -

रेल्वेचे आगाऊ आरक्षण कालावधी 120 दिवस आधी करता येते. त्यानुसार मागील तीन दिवसांपूर्वी 26 ऑक्टोबर साठीचे आरक्षण खुले झाले. त्यामुळे लोकांच्या आरक्षणासाठी उड्या पडल्या. 26 ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या नवी दिल्लीलखनऊ शताब्दी एक्स्प्रेसच्या एसी चेअर कार श्रेणीच्या सर्व जागा आतापासूनच आरक्षित झाल्या आहेत. त्यातही ५० जागांची प्रतीक्षा यादी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -