घरमुंबईउद्यापासून दोन दिवसीय विधानसभेचे विशेष अधिवेशन

उद्यापासून दोन दिवसीय विधानसभेचे विशेष अधिवेशन

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जावून मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचे असणार आहे. या अधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आलं. याबाबत उद्या अधिवेशनाचे कामकाज सुरु झाल्यावर घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार आहे आणि मग विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक होणार आहे. त्यानंतर बहुमत चाचणीचा ठराव मांडला जाईल आणि त्यानंतर बहुमत चाचणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -