घरमहाराष्ट्रलालपरित दिला गोंडस परिला जन्म

लालपरित दिला गोंडस परिला जन्म

Subscribe

अकोट ते यवतमाळ बसमध्ये एका गर्भवती महिलेने गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना गुरुवारी घडली.

अकोट ते यवतमाळ मार्गावरील एसटी बसमध्येच एका गर्भवती महिलेने गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. एसटीच्या चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिला आणि तिचे बाळ सुखरुप बचावले असल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची प्रचीती बसमधील प्रवाशांना अनुभवायला मिळाली.

एसटी महामंडळाच्या अकोट ते यवतमाळ मार्गावरील बसचे चालक व्ही.ए. इंगळे आणि वाहक ए.के. जाधव कर्तव्यावर असताना बस राजापेठ अमरावतीवरुन वैशाली मोहोकार ही गरोदर महिला यवतमाळ जाण्याकरता या आकोट-यवतमाळ बसमध्ये बसली होती. ही बस धानोरा (गुरव) थांब्याच्या समोर बस निघाल्यावर या महिलेला प्रस्तुतीच्या कळा येऊ लागल्या आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहून कामगिरीवरील चालक-वाहकांनी बस रस्त्याच्या बाजुला उभी करुन जवळच्या हॉस्पिटल आणि 108 वर कॉल करुन रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. मात्र संपर्क झाला नाही, त्यानंतर प्रसंगावधान राखत वाहक आणि चालकांनी बसमधील इतर महिला प्रवाशांच्या मदतीने बसमध्येच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वैशालीने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. प्रसुती झाल्याबरोबर कर्तव्यावरील चालक वाहकांनी ही बस प्रसुती झालेल्या वैशालीसह व नवजात बाळासह थेट बस नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय हॉस्पिटलकडे घेऊन गेले. आई व बाळाला शासकीय हॉस्पिटलात दाखल केले. आई व नवजात बाळ दोघेही सुखरुप आणि सुरक्षित आहेत. दोघांची प्रकृती व्यवस्थित आहे. अकोट आगारातील कर्तव्यावर असलेले चालक इंगळे व वाहक जाधव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

- Advertisement -

महामंडळामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी आमच्या एसटीचे चालक- वाहकाने प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार मदत केलेली आहे आणि एसटी महामंडळाचे कर्मचारी सामाजिक दृष्टिकोन ठेवून नेहमीच काम करत असतात.
– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी (काँग्रेस)

वाहक चालकांच्या सत्कार

एसटीचे चालक व्ही.ए. इंगळे आणि वाहक ए.के. जाधव यांच्या सतर्कतेमुळे गर्भवती महिला आणि तिचे बाळ सुखरुप बचावले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अकोट ते यवतमाळ एसटी डेपोत सत्कार करण्यात येणार आहे. इंगळे आणि जाधव या दोघांनी दाखविलेली समयसुचकता व कर्तव्यनिष्ठतेने एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात उंचविली व महामंडळाचे नावलौकिक झाले. त्यामुळे यांच्या सत्कार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

एसटी प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सदैव तयार असतो. गुरुवारी गर्भवती महिला प्रवाशाला प्रस्तूतीची कळा आली तेव्हा आम्ही हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला. मात्र रुग्ण वाहिका उपल्बध नव्हती. त्यामुळे आम्ही एसटी सरळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. म्हणून वेळेत उपचार मिळू शकले. बाळ व बाळंतीण सूखरुप आहेत.
– ए. के. जाधव,वाहक अकोट डेपो

 

हेही वाचा –

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -