घरमहाराष्ट्रफॉर्च्युनर मोटार चोराला हिंजवडी पोलिसांनी गोव्यातून केली अटक

फॉर्च्युनर मोटार चोराला हिंजवडी पोलिसांनी गोव्यातून केली अटक

Subscribe

महागडी फॉर्च्युनर मोटार चोरणाऱ्या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी गोवा राज्यातून अटक केली आहे. त्याच्यावर विविध राज्यात गुन्हे दाखल आहेत. वसीम कासीम सय्यद (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तो आलिशान मोटारी चोरून अर्ध्या किंमतीमध्ये विकायचा अस हिंजवडी पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व्हिसिंग सेन्टरमधून आरोपी वसीमने फसवणूक करून आलिशान फॉर्च्युनर मोटार चोरली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून वसीम हा परराज्यातील चोर असल्याचे समोर आले. अधिक चौकशी केली असता तो गोवा राज्यातील असल्याचं समोर आलं. हिंजवडी पोलीस त्याच्या मागावर गोवा येथे गेले. तो राहत असलेल्या ठिकाणी तीन दिवस पाळत ठेऊन फॉर्च्युनर मोटारीसह ताब्यात घेतले. त्याच्यावर गोवा आणि कर्नाटक येथे मोटार चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्ध गिजे, एम डी वरुडे, सहाय्यक फौजदार वायबसे, पोलीस कर्मचारी बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा –

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -