घरमुंबईहार्बर मार्गावर सलग दोन वेळा बिघाड

हार्बर मार्गावर सलग दोन वेळा बिघाड

Subscribe

मेगा ब्लॉकनंतर दुसर्‍या दिवशीच खोळंबा प्रवाशांचे हाल, रेल्वेची निष्क्रियता

मुंबई:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सलग दोन वेळा बिघाड झाल्यामुळे सकाळीच हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सीवूड्स ते बेलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले. त्यानंतर खारघर स्थानकाजवळ एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. हार्बर महामार्गावर नेहमी मेगा ब्लॉक घेऊनही या मार्गावर वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवांशानी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मध्य रेल्वेला हार्बर मार्गावर सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास सीवूड्स ते बेलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याची घटना सामोर आली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणार्‍या लोकल गाड्या खोळंबल्या. मात्र वेळेत याची दुरुस्ती करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. यामुळे काही काळ प्रवाशांचे हाल झाले. त्यानंतर 12 वाजताच्या सुमारास पनवेलकडे जाणार्‍या लोकलमध्ये खारघर स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरमध्ये बिघाड झाल्याने पुन्हा हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या दोन घटना समोर आल्यामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने हार्बर मार्गवरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली होती. एका मागे एक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.

- Advertisement -

हार्बर मार्गवर दररोज १० ते १२ लाख प्रवाशी प्रवास करतात. या मार्गवर लोकलच्या दिवसाला ऐकून ७६५ फेर्‍या होतात. मात्र नेहमीच हार्बर मार्गवरील लोकलमध्ये बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वेकडून दुरुस्तीसाठी नेहमीच मेगा ब्लॉक घेतला जातो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हार्बर मार्गावरील प्रवाशी घरातून बाहेर पडत नाही. मात्र हा मेगा ब्लॉक घेऊनसुद्धा हार्बर मार्गवर वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशाची गैरसोय होते.

मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गवरील प्रवाशांना नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो. मध्य रेल्वे नेहमी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेत असते. त्यानंतरही वारंवार बिघाड होत असल्यास मेगा ब्लॉकच्या वेळी नक्की काय पाहणी केली जाते? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हार्बर मार्गवरील लोकल वाहतुकीवर स्वत: रेल्वेमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
– दत्ता जाधव,सदस्य, प्रवासी संघटना, नेरुळ

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -