घरमुंबईलाखोंचे सोने चोरणारा दोन वर्षांनंतर तक्रार केल्यावर गजाआड

लाखोंचे सोने चोरणारा दोन वर्षांनंतर तक्रार केल्यावर गजाआड

Subscribe

व्यवसायात भागीदार असलेल्या एका सोने व्यापार्‍याने त्याच्या साथीदाराला दोन वर्षांपूर्वी फसवून लाखो रुपयांचे सोने चोरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोघांनी मिळून सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी सोने घेऊन गेलेला सहकारी परत आलाच नाही. दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर शेवटी सोनाराने त्याच्या चोर साथीदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी त्याप्रमाणे सापळा रचून चोराला अटक केली.

अंधेरीत राहणारे भरत नथीलाल वर्मा (४५) हे सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची आरोपी कमलेश हरिराम सोनी या सोन्याच्या कारागिरासोबत ओळख झाली होती. दोघांनी मिळून व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सुरुवात केली. भरत वर्मा यांच्याकडून आरोपी कमलेश सोनी हा सोने घेऊन जात होता आणि त्याची विक्री करून त्याबदल्यात पैसे किंवा मग दागिने न विकल्यास तो सात दिवसात परत करायचा. सुरुवातीला हे सगळे व्यवस्थित चालू होते. कमलेश सोनी अगदी वेळेच पैसे देत असल्याने वर्मा यांचा त्याच्यावर विश्वास बसला. नोव्हेंबर महिन्यात आरोपीने त्यांच्याकडून ३ लाख ८३ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या विक्रीसाठी घेऊन गेला. त्यातल्या काही अंगठ्या त्याने विकून त्यातले काही पैसे वर्मा यांना परत केले उर्वरित दोन लाख रुपये सात दिवसात देतो, असे सांगून तो आणखी ४ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन गेला.

- Advertisement -

आधीची आणि आताची अशी एकूण रक्कम सात दिवसात देतो असे सांगितल्याने नेहमीप्रमाणे परत करेल, असा विश्वास भरत वर्मा यांना होता. पण सात दिवसानंतरही त्याने पैसे किंवा दागिने परत न केल्याने वर्मा यांना चिंता वाटू लागली. कमलेश सोनी हा फोनदेखील उचलत नसल्याने आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच त्यांनी डी.एन.नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

पोलिसांनी आरोपी कमलेश सोनी याला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, तो आलाच नसल्याने पोलिसांनी अंधेरीच्या जे.पी.रोडवर त्याला सापळा रचून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार हे सगळे दागिने त्याने विकी हसमुख कोठारी नावाच्या एका व्यापार्‍याला विकले असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या व्यापार्‍याला ताब्यात घेऊन हा मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी कमलेश सोनी याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -