घरमुंबईआता उबर 'एक्सप्रेस पुल 'वाचवणार तुमचे पैसे

आता उबर ‘एक्सप्रेस पुल ‘वाचवणार तुमचे पैसे

Subscribe

उबरच्या 'एक्सप्रेस पुल'ची सुरुवात ही प्रायोगिक तत्वावर देशातील वेगवेगळ्या भागात सुरु करण्यात येणार आहे. एक्सप्रेस पुलला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद बघून मगच ही सेवा वाढवण्यात येणार असल्याचे उबरकडून करण्यात आला आहे.

उबर एक्सप्रेस पुल असं म्हटल्यावर साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल. उबर पुलपेक्षा उबर एक्सपेस ही ५० % टक्के स्वस्त असणार आहे आणि उबर एक्सपेक्षा ७५% स्वस्त असणार आहे. शेअर कॅब बुक करताना दोन प्रकारे करता येते. एक ज्यात कॅब तुमच्या दारापाशी येते. तर दुसऱ्या पर्यायात तुम्हाला ठराविक ठिकाणी कॅबसाठी जावे लागते. उबर एक्सप्रेस पुल ही शटल सर्व्हिससारखी असणार आहे. फक्त फरक इतकाच की, याचे दर हे आधीच्या काही अॅपपेक्षा कमी असण्याचा दावा उबरकडून करण्यात आला आहे.

प्रायोगिक तत्वावर सुरुवात

सध्या ३१ राज्यांमध्ये उबरची सेवा सुरु आहे. उबरच्या ‘एक्सप्रेस पुल’ची सुरुवात ही प्रायोगिक तत्वावर देशातील वेगवेगळ्या भागात सुरु करण्यात येणार आहे. एक्सप्रेस पुलला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद बघून मगच ही सेवा वाढवण्यात येणार असल्याचे उबरकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

आता ओला काय करणार?

कॅब सर्व्हिसमध्ये उबर आणि ओला यांची सतत स्पर्धा सुरु असते. उबरचे दर कमी असल्याने अनेकजण उबरला पसंती देतात. त्यामुळे ओलाने दर कमी केले होते. पण चालकांनी दरासाठी केलेल्या बंद नंतर या दरांमध्ये बदल करण्यात आले. त्यातच उबर आता सुरु करणार असणारी शटल सेवा ओलाकडून सुरु करण्यात आली होती. पण शटलसाठी बस सुरु केल्या होत्या. पण लोकांचा कमी मिळणारा प्रतिसाद यामुळे ही सेवा फेब्रुवारीमध्ये बदं करण्यात आली.

उबर पुल वापरा

पावसाच्या दिवसांमध्ये उबर बुक करताना अनेक अडचणी येतात. म्हणजे अनेकदा गाड्या उपलब्ध नसतात. त्यामुळे अनेकांची निराशा होते. अशावेळी लोकांना गाड्या मिळण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्याच्या विचारात आहोत. तर मुसळधार पावसात शहरातील रस्त्यांची माहिती प्रत्येक ड्रायव्हरला हवी, यासाठी चालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय अशा काही आप्तकालीन परिस्थितीमध्ये लोकांनी पुल सेवा वापरण्यासाठी प्रचार करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -