घरदेश-विदेशझाकीर नाईकला मलेशिया भारताच्या हवाली करणार?

झाकीर नाईकला मलेशिया भारताच्या हवाली करणार?

Subscribe

झाकीर नाईकला मलेशिया सरकार भारताच्या हवाली सोपवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसे झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मुत्सदेगिरीचा तो मोठा विजय असेल.

मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या अडचणी वाढल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाकीर नाईकला मलेशिया पोलिस भारताच्या हवाली करणार आहेत. प्रक्षोभक भाषण, मनी लाँड्रिंग तसेच दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याचे आरोप सध्या झाकीर नाईकवर आहेत. एनआयए या सर्व गोष्टींचा तपास करत असून मलेशिया पोलिस झाकीर नाईकला भारताच्या हवाली करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. झाकीर नाईकला भारताच्या हवाली सोपवल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मुत्सदेगिरीचा हा मोठा विजय असेल. दरम्यान, झाकीर नाईकने मात्र एका वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधित वृत्त संपूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. मला भारताच्या हवाली करण्यात येणार असल्याची बातमी ही पूर्णपणे चुकीची आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सध्या माझी भारतामध्ये परतण्याची इच्छ नसून ज्यावेळी निष्पक्ष सरकार सत्तेवर असेल आणि मला सुरक्षित वाटेल त्याच वेळी मी भारतात परतेन असे यावेळी झाकीर नाईकने स्पष्ट केले.

झाकीर नाईक भारतासाठी महत्त्वाचा

प्रक्षोभक भाषणं देऊन भारताविरोधात गरळ ओकण्यास झाकीर नाईक अग्रसर आहे. २०१६ साली ढाकामध्ये झाकीर नाईकने केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे ढाकामध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाली होती. ढाक्यातील बॉम्बस्फोटामधील ISISचे दहशतवादी हे झाकीर नाईकच्या विचाराने प्रेरित झाले होते. या बॉम्बस्फोटामध्ये २२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये एका भारतीय मुलीचा देखील समावेश होता. एनआयएने झाकीर नाईकविरोधातील कारवाई अधिक कडक केल्यानंतर त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर देखील बंद घालण्यात आली आहे. २०१६ साली भारत सोडून गेलेला झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये वास्तव्याला आहे. प्रक्षोभक भाषण, मनी लाँड्रिंग तसेच दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याच्या आरोपाखाली झाकिर नाईकवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याचे प्रत्यापण भारतासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. झाकीर नाईक पीस टीव्ही नावाचे न्युज चॅनल देखील चालवत असून सध्या त्याच्यावर भारत आणि बांगलादेशमध्ये बंदी आहे. याच टीव्ही चॅनलच्या माध्यमातून झाकीर नाईक प्रक्षोभक भाषणे देत असल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, झाकीर नाईकविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची भारताने इंटरपोलला केलेली विनंती फेटाळून लावण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -