घरमुंबईउद्धव ठाकरेंनी पुन्हा बोलावली आमदारांची बैठक

उद्धव ठाकरेंनी पुन्हा बोलावली आमदारांची बैठक

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक येत्या २२ नोव्हेंबरला बोलावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातीस सत्तापेच संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याअगोदर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत आमदारांनी उद्धव ठाकरे यांना सत्ता स्थापनेचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केल्याचे शिवसेनेचे आमदारा अब्दूल सत्तार यांनी सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ‘मातोश्री’वर सेनेच्या सर्व आमदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीला येताना उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना आधारकार्ड आणि इतर ओळखपत्र घेऊन आणण्याचे आदेश दिले आहेत.


हेही वाचा – सत्ता स्थापनेच्या दिशेने दिल्लीत जोरदार हालचाली; संजय राऊत – राष्ट्रवादी भेट

- Advertisement -

आमदारांच्या बैठकीत चर्चा काय होणार?

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. ओल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती भीषण झाली आहे. मात्र, राज्यात अध्यापही सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याचे दिसत आहे. भाजपशी मैत्री तोडून आता शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याची इच्छा आहे. मात्र, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यासाठी सकारात्मक नसल्याची बाब समोर येत होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास तयार आहेत. याशिवाय काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नेते शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. मात्र, दिल्लीत ज्या घडोमोडी होत आहेत, त्यामुळे शिवसेनेची कोंडी होत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, असे प्रयत्न शिवसेनेचा असणार आहे.


हेही वाचा – सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही – केंद्र सरकार

- Advertisement -

उद्या दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक

दरम्यान, मंगळवारी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि अजित पवार यांची भेट घेतली. सत्ता स्थापनेची प्रक्रिया जलद गतीने व्हावी अशी शिवसेनेची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. त्याच पार्श्वभीवर दिल्लीत राष्ट्रवादी-काँग्रेस दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर सर्व नेते मुंबईत परतणार आहेत. तसेच संजय राऊत सुद्धा उद्या मुंबईत परतण्याची शक्यता आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आधारकार्ड, ओळखपत्रासहीत आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -