घरमहाराष्ट्रनाशिक शहरात धुमाकूळ घालणारा चोर गजाआड

नाशिक शहरात धुमाकूळ घालणारा चोर गजाआड

Subscribe

त्याच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकींसह १६ मोबाईल असा एकूण सुमारे सव्वा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

शहरात दुचाकी, मोबाईल चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यास पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीच्या चार दुचाकींसह १६ मोबाईल असा एकूण सुमारे सव्वा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केली. विजय तुकाराम वाघमारे (४० मूळ रा.वेणी, जि. बुलढाणा, हल्ली रा. अंबड, नाशिक) असे अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

हेही वाचा – नाशकात ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई

अशी केली चोराला अटक

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून काही दिवसांपूर्वी एमएच १५ बीवाय ८७१३ ही दुचाकी चोरीला गेली होती. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये मध्यवर्ती गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली. पथकाला शनिवारी (दि. १६) मिळालेल्या माहितीच्या आधारे वाघमारे यास अंबड पोलीस ठाणे हद्दीत अटक केली. पोलीस तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याने चार मोटारसायकली आणि १६ मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ३ लाख १३ हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या अटकेने म्हसरूळ, वावी, भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन आणि अन्य ठिकाणच्या एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व सहाय्यक आयुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, निरीक्षक सुनिल रोहकले, सहाय्यक निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक महेश शिंदे, जमादार शंकर गोसावी, दत्तात्रेय कडनोर, पोलीस हवालदार भिमा कर्डीले, दिलीप ढुमणे, दिपक पाटील, पोलीस नाईक मनोहर नागरे, रेखा गायकवाड, निलीमा निकम, संजय गामणे शिपाई भरत हिंडे, मिलींद बागुल, अनिल शिंदे, अतुल पाटील यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -