घरमुंबईकनिष्ठ अभियंत्यांची परीक्षा अखेर पार पडली

कनिष्ठ अभियंत्यांची परीक्षा अखेर पार पडली

Subscribe

स्थायी समितीला डावलून परीक्षा घेतलीच

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यातील कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्तपदांसाठी घेण्यात आलेली भरती परीक्षा सोमवारी पार पडली. मुंबईसह राज्यातील २३ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. ही परीक्ष घेण्यासाठी नेमण्यात येणार्‍या आय.बी.पी.एस या संस्थेची नेमणू करण्याचा प्रस्ताव नामंजूर करत यासाठी होणारा खर्च अधिकार्‍यांच्या खिशातून वसूल करण्याचे आदेश स्थायी समितीने दिल्यामुळे ही परीक्षा रद्द होईल का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु स्थायी समितीला न जुमानता प्रशासनाने नियोजित वेळेत परीक्षा घेत समितीच्या मागणीला हरताळ फासला.

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत या संवर्गातील ३४१ कनिष्ठ अभियंता पदासाठी जाहीरात प्रकाशित केल्यांनतर प्रशासनाने निवडणुकीच्या कालावधीमध्ये अर्थात १२ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागवले. आचारसंहितेच्या काळातच हे अर्ज मागवण्यात आल्यामुळे अनेकांना या परीक्षेची कल्पना नाही. त्यामुळे अर्ज मागवण्यासाठी अजुन १५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला जावा,अशी मागणी राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली होती. त्याला भाजपचे प्रभाकर शिंदे तसेच सपाचे रईस शेख आणि सभागृहनेत्या विशाखा राउुत यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर स्थायी समिती या मागणीवर ठाम राहिली व समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या परीक्षेसाठी नेमण्यात येणार्‍या आय.बी.पी.एस या संस्थेची नेमणू करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला.

- Advertisement -

समितीच्या मागणी तसेच निर्णयानंतर प्रशासनाने आपल्या भूमिकेत कोणताही बदल न करता नियोजित वेळेतच ही परीक्षा ओटोपून धेतली. या परीक्षेसाठी सुमारे ३६ हजार अर्ज प्राप्त झाले होते. या सर्वांना आयबीपीएस कंपनीने हॉल तिकीट पाठवून सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईसह राज्यातील २३ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कनिष्ठ अभियंत्यांची परीक्षा पार पडली असून २३ परीक्षा केंद्रांवर ही ती सुरळीत पार पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाबाबत निर्णय घेण्यापूर्वीच संबंधित संस्थेने परीक्षा प्रक्रीयेला सुरुवात केली होती. राज्यातील कानाकोपर्‍यातील उमेदवारांना याचे परीक्षा प्रवेशपत्र पाठवण्यात आले होते. त्यामुळे ती रद्द करणे शक्य नव्हते,असेही स्पष्ट केले.

ही परीक्षा रद्द करावी अशी माझी किंवा अन्य सदस्यांची मागणी नव्हती. केवळ अर्ज मागवण्याचा मुदत कालावधी वाढवून द्यावा हीच मागणी होती. परंतु प्रशासनाने एकप्रकारे स्थायी समितीचा तर अवमान केलाच आहे, शिवाय आता र आम्हाला प्रशासनावरच शंका वाटू लागली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रीयेची चौकशी करण्याची मागणी आमची राहिल,असे राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -