घरमुंबईउद्धव ठाकरे छोटे भाऊ - नरेंद्र मोदी

उद्धव ठाकरे छोटे भाऊ – नरेंद्र मोदी

Subscribe

मुंबईत मेट्रोच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांसाठी शनिवारी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला लहान भाऊ असे म्हणत आपल्या भाषणाच्या सुरूवातीलाच वातावरण निर्मिती केली. त्यामुळे लहान आणि मोठा भाऊ कोण यासाठी शिवसेना आणि भाजपमधील स्पर्धा यानिमित्ताने रंगली आहे.

भाषणाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना भाजपच मोठा भाऊ असणार याचे संकेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाआधीच उद्धव ठाकरे यांनीही युतीची भाषा करत नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने पंतप्रधानांनी या आधी बीकेसीमध्ये हजेरी लावली होती. लोकसभेत देशात विजयी कौल मिळाल्यावर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मुंबईतील लोकसभेच्या निमित्ताने झालेल्या संवादाची चर्चा ही देशभरात अनेक ठिकाणी उशिरापर्यंत चालली होती. मुंबईकरांनी दिलेल्या आशीर्वादासाठी त्यांनी शहरवासीयांचे आभार मानले. मुंबई स्पिरीट मी नेहमी पाहिले आहे, अनुभवले आहे. मुंबई शहराच्या गतीने देशाला गती दिली असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. मेहनत करणार्‍यांचे, प्रोफेशनल्सचे, माता-युवकांचे अशी मी मुंबईकर ही ओळख असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. गेल्या पाच वर्षात मुंबईत पायाभूत सुविधा विकासासाठी प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे मुंबईत आता बदल होण्याची सुरूवात झाली आहे. मुंबईच्या गतीशील विकासामुळे देशाच्या विकासालाही चालना मिळत असल्याचे, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -