घरमुंबईविसर्जित गणेशमूर्तींपासून बनवणार विटा!

विसर्जित गणेशमूर्तींपासून बनवणार विटा!

Subscribe

 पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचा पुढाकार

श्री गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सध्या घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपां करण्यात आलेली आहे. मात्र बाप्पांचे आगमन झाल्यापासून दीड दिवसापासून ते शनिवारी गौरीगणपतींसह बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन मुंबईच्या समुद्रांपासून ते तलावांपर्यंत तसेच कृत्रिम तलावांमध्ये केले जात आहे. परंतु विसर्जित केलेल्या बहुतांश गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे समुद्रात तसेच तलावांमध्ये त्या पूर्णपणे त्यांचे विघटन होत नाही. त्यामुळे जलप्रदूषण होते. ते रोखण्यासाठी या विसर्जित मूर्ती एनजीओच्या माध्यमातून सिमेंट फॅक्टरीत पाठवून त्यापासून विटा बनवण्याचा विचार महापालिका करत आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नाही. त्यामुळे अशा विसर्जित मूर्तीचे पुन्हा समुद्रांमध्ये विसर्जन केले जाते. परंतु यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे घटक पाण्यात मिसळून समुद्राचे पाणी दूषित होते. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. या विसर्जित मूर्ती सिमेंटच्या कंपन्यांमध्ये पर्यायी कच्चे मटेरियल म्हणून पाठवले जावे, अशी सूचना पर्यावरणप्रेमी संस्थांकडून केली जात आहे.

- Advertisement -

नेप्रा या संस्थेने मागील महिन्यात महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना पत्र पाठवून विसर्जित गणेशमूर्तींची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावली जावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिकेची परवानगी मिळाल्यास या विविध ठिकाणच्या गणेशमूर्ती आपण ट्रकमधून सिमेंट उत्पादन कंपन्यांकडे पाठवू. जेणेकरून त्याचा योग्य वापर होऊ शकेल.
त्यानुसार महापालिकेने विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रात विसर्जित न करता एका जागेवर जमा करून ठेवल्या आहेत. त्यानुसार या मूर्ती एनजीओच्या माध्यमातून सिमेंट कंपनीकडे पाठवले जाणार आहे.

मुंबईत दीड दिवसाच्या ६२ हजार तर पाच दिवसाच्या ६०५७ सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले आहे. तर शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११०९ गौरीगणपतीच्या मूर्तींचे विसर्जन झाले आहे. शिवाजीपार्कसह दादर भागातील चौपाटीसह कृत्रिम तलावांमध्ये मोठ्याप्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. यासंदर्भात जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विसर्जित गणेशमूर्ती एकत्र जमा करून ठेवलेल्या आहेत. त्या सर्व विसर्जित गणेशमूर्ती एका एनजीओमार्फत सिमेंट कारखान्यात पाठवल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

गोरेगावमध्येही अशाप्रकारे एनजीओमार्फत विसर्जित गणेशमूर्ती गोळा केल्या जात आहेेत. महापालिकेच्यावतीने या विसर्जित मूर्ती दान केल्या जात आहेत. पांडुरंगवाडी येथे या संस्थेच्यावतीने मूर्ती जमा करून त्यांची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावली जात असल्याचे पी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -