घरमुंबईतर्राट चालकाने चालवली बस

तर्राट चालकाने चालवली बस

Subscribe

प्रवासी आणि पादचारी बचावले

अपघाती सेवा म्हणून कुप्रसिद्ध ठरत असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसचालक सकाळीच तर्राट असल्याचे उघडकीस आले. मद्यपान केलेल्या चालकाने नशेत सुसाट बस भिंतीला ठोकल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
भगिरथी ट्रान्स कॉर्पोरेशन कंपनीद्वारे चालवण्यात येणारी महापालिकेची परिवहन सेवा अपघाती सेवा म्हणून कुप्रसिद्ध ठरली आहे. या परिवहनाने आतापर्यंत अनेक प्रवाशांचे बळी घेतले आहेत. शनिवारी सकाळी परिवहनच्या बसने अजब प्रकार केला. सकाळी 9.30 वाजता नालासोपारा-नाळा अशी ही बस सोडण्यात आली.

प्रवासी बसमध्ये बसल्यावर बस वेडीवाकडी धावू लागली. त्यामुळे भयभीत झालेल्या प्रवाशांनी आरडाओरडा करून बस हळू चालवण्याची विनंती चालकाला केली. त्यावेळी बस एका भिंतीला जाऊन धडकली. प्रवाशांनी चालकाला फैलावर घेतले असता त्याने मद्यपान करून बस चालवली असल्याचे स्पष्ट झाले. दारूच्या नशेत चालकाने तीन ते चार किलोमीटर बस पळवल्याचेही समोर आले. काही चालकांनी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी मद्यधुंद चालक भागवत हरी हाके याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी त्याला ताबडतोब बडतर्फ केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -