घरमुंबई'वंचित'चा जाहीरनामा प्रसिद्ध

‘वंचित’चा जाहीरनामा प्रसिद्ध

Subscribe

जाहीरनामा सादर केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चिन्ह आहे.

विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना विविध राजकीय पक्षांनी लोकांशी थेट संपर्क साधण्याला सुरूवात केली आहे. याउलट अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आज पत्रकार परिषदेचे आयोजन करत ‘वंचित बहुजन आघाडीचा’ विधानसभा निवडणूकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनामा सादर केल्यामुळे वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चिन्ह आहे.

मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील पक्ष कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा प्रभाव दिसून आला. विधानसभा निवडणुकीत वंचितचा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे वंचितला सोबत घेण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याने वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

वंचितचा जाहीरनामा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केंद्रात कामगार मंत्री होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना ८ तास ड्यूटी असावी, असे म्हटले होते. पण एकाही केंद्र सरकारने पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी करण्यासाठी प्रयत्न न केल्याची खंत, अॅड. बाबासाहेब आंबेडकर यांनी बोलून दाखवली. जाहीरनाम्यात जनतेला काही आश्वासने देण्यात आली आहेत. पोलिसांना ८ तासांची ड्यूटी, होमगार्ड्सना पगारी कामगार म्हणून सेवेत घेण्याबाबतचे आश्वासन देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -