घरमुंबईआवक वाढली तरी भाज्यांचे दर चढेच

आवक वाढली तरी भाज्यांचे दर चढेच

Subscribe

राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीही किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर चढेच आहेत.

राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा भाज्यांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरीही किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर चढेच आहेत.
मागील दोन दिवसांत तब्बल १ हजार २२९ गाड्यांची आवक झाली आहे.

मागील महिन्यात भाज्यांचे दर वाढले होते. वाटाणा तर 50 ते 60 रुपये किलोने विकला जात होता. तोच वाटणा आता अर्ध्या किमतीवर आला असून घाऊक बाजारात 30 ते 35 रुपये किलोने विकला जात आहे. मात्र किरकोळ व्यापारी 70 ते 80 रुपये किलोनेच वाटाणा विकत आहेत. घाऊक बाजारात ग्राहकांना जरी दिलासा मिळाला असला तरी किरकोळ बाजारात मात्र खिशाला कात्री लागली जाते .त्यात घाऊक बाजारात टोमॅटो 8 ते 12 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो विकला जात आहे.

- Advertisement -

राज्यातील पावसामुळे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात भाज्यांचे चांगले उत्पादन झाले आहे. श्रावण महिन्याच्या सुरुवातील एक हजार 667 गाड्या भरून भाज्या घाऊक बाजारात आल्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्याचा परिणाम किरकोळ बाजारात दिसत नाही. यात कोबी व फ्लॉवर हे तर 10-15 रुपये किलोच्या घरात आले आहेत. केळीची भाजी घाऊक बाजारात 22-28 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 60 रुपये किलो आहे. तर सूरण 20-22 रूपये घाऊक तर किरकोळ मध्ये 80 रुपये किलो विकला जात आहे.किरकोळ बाजारात प्रत्येक भाजी ही 15 ते 20 रुपये पाव किलो प्रमाणे विकली जात आहे.

राज्यात पडणार्‍या पावसामुळे भाज्यांचे उत्पन्न अधिक वाढल्याने त्यांची आवक ही वाढू लागली आहे.त्यामुळे भाज्यांचे दर आणखी कमी होत आहेत. किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर कमी व्हायला हवेत.
– रामदास पवळे, व्यापारी, घाऊक भाजी मार्केट

भाजी मार्केटमध्ये अनेक भाज्यांचे दर कमी जास्त होतच असतात. आमचा संसार हा याच व्यवसायावर असून त्यामुळे कधी कमी तर जास्त भावात भाज्या विकाव्या लागतात. व्यवसाय करत असतांना खूप माल खराब होतो. ते आम्ही कोणाला सांगणार? त्यामुळे कधी जास्त तर कधी कमी दरात भाज्या विकाव्या लागतात.

-सचिन इंगोले, किरकोळ भाजी विक्रेता, नेरुळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -