घरमुंबईपोलीस ठाणी की भंगार वाहनांची गोदामे

पोलीस ठाणी की भंगार वाहनांची गोदामे

Subscribe

बेवारस गाड्यांमुळे पोलिसांना डोकेदुखी

अनेक पोलीस ठाण्यांना हक्काचा मोकळा भूखंड उपलब्ध नसल्याने पोलीस ठाण्याबाहेर व परिसरात विविध गुन्ह्याखाली जप्त केलेली वाहने सांभाळणे सर्वच पोलीस ठाण्यांना डोकेदुखी ठरत आहेत. अनेक पोलीस ठाण्यांमध्ये जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तरतुदीनुसार केला जात आहे. या प्रक्रियेत पहिली नोटीस संबंधित वाहन मालकाला देण्यात येते व त्यानंतर वाहनाची विल्हेवाट लावण्यात येते. परंतु ही प्रक्रिया संथ गतीने होत असल्याने पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर , कामोठा व खारघर पोलीस ठाणे आदी ठाण्यांतर्गत अनेक जप्त केलेल्या गाड्या वर्षानुवर्षे तशाच धूळ खात पडलेल्या आहेत.

यात दुचाकी, सायकली, चारचाकी वाहने, ट्रक, डंपर, कंटेनर तर काही गाड्यांचे सांगाडे ठाण्याच्या जागा अडवून आहेत. या वाहनांमुळे पोलीस ठाणेही विद्रुप दिसत आहे. त्याचप्रमाणे काही वाहने रस्त्यावरच उभी करण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांना अडथळीची शर्यत पार करायला लागते आहे. अनेक वाहनांच्या परिसरात रानटी गवत वाढल्याने या वाहनांच्या अडगळीत सर्प व इतर प्राणी वास्तवास आहेत. तरी यासंदर्भात शासनाने ठोस उपाययोजना करून जप्त केलेली वाहने पोलीस ठाणे मुक्त करावी अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -

जप्त केलेल्या अनेक वाहनांना गंज लागला असल्याने अनेक वाहने भंगारात जमा झाली असून अनेकांचे स्पेअरपार्ट गायब आहेत. पोलिसांनी अपघात, चोरी इ. वेगवेगळ्या प्रकरणात मुद्देमाल म्हणून वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे. यात दुचाकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जप्त केलेल्या वाहनांचे मूळ मालक पोलिसांना सापडले नसल्याने व वाहन मालकांनीही वाहने परत आणण्याची तसदी न घेतल्यामुळे ही वाहने पोलीस ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून तशीच पडून आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -