घरमुंबईज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना लिलावतीतून डिस्चार्ज; सायरा बानोंचे भावनिक ट्विट

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना लिलावतीतून डिस्चार्ज; सायरा बानोंचे भावनिक ट्विट

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीमधील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना गुरुवारी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून ते पुन्हा एकदा सुखरुप घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार न्यूमोनियाने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, गुरुवारी प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यापासूनच त्यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांना लिलावतीतून डिस्चार्ज मिळाला असून दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून डिस्चार्ज संबंधात ट्विट केले आहे. “डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल मी आभारी आहे”, असा संदेश या ट्विटमध्ये दिलीप कुमार यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे.

- Advertisement -

दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि हिंदी सिनेसृष्टीच्या ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सुद्धा दिलीप कुमार यांच्या तब्येतीबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे. “माझे कोहिनूर, माझे साहेब, माझ्या स्वप्नातील व्यक्ती, माझे युसुफ जान आहेत. आज लाखो हितचिंतक, मित्र आणि नातेवाईकांनी फोन आणि मेसेज करुन आमच्या लग्नाच्या ५२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासाठी फक्त थँक्स बोलणे पुरेसे ठरणार नाही. माझ्या आठवणीतला माझा आवडता फोटो मी इथे शेअर करत आहे.”

- Advertisement -

दिलीप कुमार यांना ७ ऑक्टोबर रोजी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ३ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. दिलीप कुमार यांचे निकवटर्तीय फैसल फारुकी यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून त्यांच्या डिस्चार्ज बाबत माहिती दिली आहे. याआधीही दिलीप कुमार यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिहायड्रेशनच्या कारणामुळे त्यांची तब्ब्येत आणखी बिघडली होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -