घरमहाराष्ट्रभीमा-कोरेगाव दंगलीमागे एल्गार परिषदेचा हात - सत्यशोधन समिती

भीमा-कोरेगाव दंगलीमागे एल्गार परिषदेचा हात – सत्यशोधन समिती

Subscribe

कोरेगाव भीमा दंगलीला एल्गार परिषद उत्तरदायी आहे, असा अहवाल सिटीझन फोरम फॉर जस्टिसच्या वतीने संघटित करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीने पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धीमाध्यमांपुढे मांडला आहे.

एल्गार परिषदेमध्ये ब्राह्मणविरोधी इतिहास मांडण्यात आला आहे. संभाजी महाराज यांची हत्या औरंगजेबाने केली नसून ब्राह्मणांनी केली, असा इतिहास मांडून लोकांना भडकवण्यात आले. त्यामुळे कोरेगाव भीमा दंगल घडली. कोरेगाव भीमा दंगलीला एल्गार परिषदच उत्तरदायी आहे, असा अहवाल सिटीझन फोरम फॉर जस्टिसच्यावतीने संघटित करण्यात आलेल्या सत्यशोधन समितीने पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धीमाध्यमांपुढे मांडला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार नसलेल्या भारिप बहुजन संघाच्या काही कार्यकर्त्यांनी घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सिटीझन्स फोरम फॉर जस्टिस ही स्वयंसेवी संस्था असून माजी ज्येष्ठ न्यायमूर्ती एम्. रामकृष्ण या संघटनेचे संचालक आहेत.

स्थानिकांची संवाद साधून सिद्ध केला अहवाल

कोरेगाव भीमा दंगलीमागील सत्यशोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या ७ सदस्यीय समितीने विजयस्तंभ, कोरेगाव भीमा, वढू आणि सणसवाडी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन स्थानिकांची संवाद साधून हा अहवाल सिद्ध केला आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे सदस्य सी.एस्. पार्चा (निवृत्त पोलीस आयुक्त), गुरुराज राव (माजी मुख्य संचालक, गुजरात इन्फोमॅटिक्स), डॉ. कमल मेहता (प्राचार्य, सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट) आणि समितीचे सचिव प्रो. उमामहेश सत्यनारायण उपस्थित होते. अधिवक्ता प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची या घटनेविषयी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला; मात्र त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही, ही माहितीही सत्यशोधन समितीच्या वतीने प्रसारमाध्यमांपुढे ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

या अहवालात काय म्हटले आहे?

या समितीने अहवालामध्ये म्हटले आहे की, कोरेगाव भीमा दंगल होण्यापूर्वी एल्गार परिषदेने महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रेरणा मोर्चाचे आयोजन करून त्यामध्ये प्रक्षोभक आणि भडक घोषणा देऊन दलित आणि अन्य समाज यांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दलित आणि अन्य समाज यांमध्ये तिरस्कार वाढावा, यासाठीची ही पूर्वसिद्धता होती. १ जानेवारी या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी नष्ट करण्यात आल्याची अफवा समाजमाध्यमांद्वारे उठवण्यात आली. त्यामुळे अनेक मराठा युवक वढू येथे समाधीच्या रक्षणासाठी एकत्रित आले. एल्गार परिषदेमध्ये जिग्नेश मेवाणी, सोनी सोरी, उमर खलिद या डाव्या विचारांच्या नेत्यांनी दलितविरूद्ध राज्य आणि केंद्र शासन असे विचार मांडून प्रक्षोभक भाषणे देखील केली.

हिंसाचार टळला असता

विशेष म्हणजे दंगलीच्या दिवशी एल्गार परिषदेचा एकही नेता कोरेगाव भीमा येथे गेला नाही; कारण तेथे दंगल होणार हे त्यांना माहित होते. एल्गार परिषदेने या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे जोडली असली, तरी ते सत्य नाही. कारण त्यांची उपस्थिती दर्शवणारे गर्दीचे कोणतीही ध्वनीचित्रफीत आणि छायाचित्र उपलब्ध नाही. तसेच दलितांविरूद्ध मराठ्यांना भडकवण्याची कोणतेही प्रक्षोभक भाषणे त्यांनी केलेली नाहीत किंवा प्रक्षोभक फलक लावण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी एकत्र आलेले मराठे युवक हे दलित छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीवर आक्रमण करत आहेत, या अफवेची तात्कालीन प्रतिक्रिया होती. २९ डिसेंबर २०१७ या दिवशी पोलिसांनी वढू येथे मराठ्यांचा उठाव टाळण्यासाठी पुरेसा पोलीस ताफा ठेवला असता, तर पुढील हिंसाचार टळला असता. या समितीने छत्रपती संभाजी महाराज यांचे अंतिमसंस्कार, गोविंद गोपाळ यांना दिलेली सनद तसेच अन्य तथ्ये यांचा अभ्यास करण्यासाठी आणि यामागील सत्य पुढे येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ इतिहासतज्ञांची समिती नियुक्त करावी, अशी मागणीही या समितीच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -