घरमुंबईविष्णुदास भावे नाट्यगृहाचे काम सप्टेंबरमध्ये सुरू होणार

विष्णुदास भावे नाट्यगृहाचे काम सप्टेंबरमध्ये सुरू होणार

Subscribe

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोयीसुविधा आणि नूतनीकरणासाठी कोणताही कंत्राटदार पुढे येत नव्हता. अनेक महिन्यांपासून या नाट्यगृहाचे नूतनीकरण रखडले होते. या कामाला काही कंत्राटदारांनी होकार दर्शविल्याने पुन्हा नूतनीकरणाच्या कामाला गती आली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये नूतनीकरणाला सुरुवात होणे अपेक्षित होते.१३ कोटी रुपये खर्चाची पहिली निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ दोनच कंत्राटदारांनी या कामात रस दाखविला.

निविदा नियमानुसार तीन निविदा आल्याशिवाय एका कंत्राटदाराला काम देता येत नाही. त्यामुळे पालिकेने फेरनिविदा मागवली. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. येत्या ७ ऑगस्ट रोजी तिसरी निविदा प्राप्त होणार आहे. या निविदा प्रक्रियेत एका जरी निविदाकाराने रस दाखविला तरी ती स्वीकारण्याचा अधिकार पालिकेला आहे. त्याला महिनाअखेर कामाचे आदेश दिले जाणार असून सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, हा एक कंत्राटदार मिळणे आवश्यक असल्याने हे काम प्रत्यक्ष सुरू होईल, का या बाबत संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सिडकोने बांधलेले भावे नाट्यगृह पालिकेने जून १९९७ रोजी आपल्या ताब्यात घेतले. गेल्या २० वर्षांत या नाट्यगृहाची म्हणावी तशी डागडुजी झालेली नाही. ध्वनियंत्रणा निकृष्ट झाली आहे. कलाकारांचा रंगभूषा कक्ष, तालीम कक्ष, शौचालये, विश्रांती कक्षांची दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी नाटक सुरू असताना कलाकारांना प्रयोगातच डास मारण्याचं अ‍ॅडीशन टाकावं लागत होतं.

काही वर्षांपूर्वी तर ऐन पावसाळ्यात व्यासपीठावरील छत कोसळले होते. त्यामुळे नूतनीकरणाची आवश्यकता होती. नूतनीकरणासाठी १३ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या निविदेला डिसेंबर २०१७ मध्ये प्रशासकीय आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये नूतनीकरणाला सुरुवात होणे अपेक्षित होते. १३ कोटी रुपये खर्चाची पहिली निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ दोनच कंत्राटदारांनी या कामात रस दाखविला. येत्या ७ ऑगस्ट रोजी तिसरी निविदा प्राप्त होणार आहे. या निविदा प्रक्रियेत एका जरी निविदाकाराने रस दाखविला तरी ती स्वीकारण्याचा अधिकार पालिकेला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पुढील आठवड्यात कंत्राटदार निश्चित होणार आहे. त्याला महिनाअखेर कामाचे आदेश दिले जाणार असून सप्टेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

जानेवारीपासून काढण्यात आलेल्या दोन निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाट्यगृहाचे काम रखडले आहे. या महिन्यात येणार्‍या निविदेला स्वीकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काम खर्‍या अर्थाने सुरू होणार असून एका अद्यायावत नाट्यगृहाची उभारणी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.– मोहन डगांवकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -