घरमुंबईविरारमध्ये खाकीतल्या माणुसकीचे दर्शन

विरारमध्ये खाकीतल्या माणुसकीचे दर्शन

Subscribe

नातेवाईक आणि समाजाने टाकलेल्या बेवारस कुष्ठरोग पिडित वृद्धेची विरार पोलिसांकडूनच सेवासुश्रूषा सुरू आहे. विरारमधील रस्त्यांवर एक 75 वर्षांची ही बेवारस वृद्धा वेदनेने विव्हळत होती. एका समाजसेवकाने तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढे या वृद्ध महिलेचे काय झालं हे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी ...

नातेवाईक आणि समाजाने टाकलेल्या बेवारस कुष्ठरोग पिडित वृद्धेची विरार पोलिसांकडूनच सेवासुश्रूषा सुरू आहे.
विरारमधील रस्त्यांवर एक 75 वर्षांची ही बेवारस वृद्धा वेदनेने विव्हळत होती. एका समाजसेवकाने तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. कुष्ठरोगामुळे या महिलेच्या हातपायांची बोटे झडली आहेत, त्यावर बांधलेल्या चिंध्या, मळलेल्या कपड्यांना येणारी कमालीची दुर्गंधी अशा स्थितीत पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. हे पोलीस आपल्याला कुठे नेत आहेत, असं समजून तिने पोलिसांना शिव्याशाप देण्यास सुरुवात केली. मधूनच ही माहिला माझा भाऊ गोरेगाव स्टेशनवर भीक मागतो, त्याला बोलवा असं पोलिसांवर डाफरत होती. तणावात काम करणार्‍या पोलिसांनी मात्र या महिलेवर न रागवता तिची मानसिक स्थिती समजून घेत तिला माणुसकीचा आधार दिला.

हॉस्पीटल्सनी दाखल करण्यास दिला नकार

आजारी असतानाही ही वृद्धा तिच्या नातेवाईकांना भेटण्याची इच्छा बोलून दाखवत होती मधूनच पोलिसांना शिव्या देत होती. पण पोलिसांना चिंता होती तिच्या भूकेची. पोलिसांनी तिला आधी जेवण दिलं,कपडे दिले. त्यानंतर काही हॉस्पीटल्सची संपर्क साधून तिच्यावर उपचाराची व्यवस्था सुरू केली. त्यासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू झाले. मात्र, हॉस्पीटल्सनची बेवारस वृद्धेला दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर महिला पोलीस निरिक्षक रोहीणी डोके यांनी आठवडाभर एका महिला आणि पुरुष पोलीस कर्मचार्‍याच्या सहाय्याने तिची सेवा सुश्रूषा केली. कुष्ठ रोग आणि इतर आजारांच्या शक्यतेमुळे वृद्धेवर उपचार करणं गरजेचं होतं. वृद्धेची रोजची आंघोळ, तिला कपडे घालणे, जेवणची व्यवस्था अशी सगळी कामं रोहीणी डोके यांच्या पुढाकाराने पोलिसांनी आनंदाने केली. या वृद्धेला तपासणी, उपचारासाठी दवाखान्यात तसेच कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयात नेण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्थाही पोलिसांनीच केली. वृद्धेच्या नातेवाईकांसोबत तिची भेट घडवण्याचा प्रयत्नही पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisement -

माझी तीन मुले गोरेगावला राहातात, त्यांना बोलवा

मानसिक आजारामुळे या महिलेला तिचे नाव , पत्ता, इतर माहिती सांगता येत नाही. माझी तीन मुले आणि एक मुलगी गोरेगावला राहातात,भाऊ दादरला भीक मागतो, इतकंच ती सांगते. कायदेशीर कार्यवाहीनुसार ठाणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या महिलेला आता ठाण्याच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. तिच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -