घरमुंबईभाजपच्या बालेकिल्ल्यातच सेनेला कमी मतदानाचा फटका

भाजपच्या बालेकिल्ल्यातच सेनेला कमी मतदानाचा फटका

Subscribe

डोंबिवलीमध्ये मतदारांची वगळलेली नावे आणि मतदारांच्या स्लीपा घरोघरी पोहचविण्यात शिवसेना आणि भाजपच्या मंडळींनी हात आखडता घेतला.

डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र बालेकिल्ल्यातच शिवसेनेला सर्वाधिक कमी ४२.२७ टक्के मतदान झाले आहे. मतदारांची वगळलेली नावे आणि मतदारांच्या स्लीपा घरोघरी पोहचविण्यात शिवसेना आणि भाजपच्या मंडळींनी हात आखडता घेतला. या कारणांमुळे कमी मतदानाचा फटका बसल्याचे बोललं जातय. मात्र मतदानाच्या दिवशी डोंबिवलीतील सेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयात अनेक स्लीपा आढळून आल्या. यांसदर्भात त्या नगरसेवकाला विचारले असता, त्यांनी ही नावे मिळाली नसल्याने या स्लीपा परत आल्याची सारवासारव केली. मात्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात मतदारांच्या स्लीपा वाटल्या नसल्याचेच दिसून येतय.

डोंबिवलीत सर्वात कमी मतदान

ठाणे जिल्हयात कल्याण लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी ४४.२७ टक्के मतदान झाले आहे. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. रविंद्र चव्हाण हे आमदार असून राज्यमंत्री आहेत. कल्याण लोकसभेतील सहा मतदार संघापैकी सर्वाधिक कमी मतदान डोंबिवलीत झाले आहे. डोंबिवलीतील सुमारे ९५५१ नावे वगळण्यात आल्याचा फटकाही मतदारांना बसला आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत जोशाने उतरणारे शिवसैनिक यंदा रस्त्यावर उतरलेले दिसून आले नाही.

- Advertisement -

मतं कोणाच्या पारड्यात गेली?

भाजपच्या वॉर्डातही त्याहून वेगळी स्थिती नव्हती. डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक हे कल्याणमध्ये कपिल पाटील यांच्या प्रचारात गुंतले होते. तसेच कल्याण आणि ठाण्यातील सेनेचे नगरसेवक डोंबिवलीत प्रचारासाठी आले होते. मात्र सेनेच्या स्थानिक नगरसेवकांकडून यंदाच्या निवडणुकीत विशेष काम केले नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डोंबिवलीत मतदानाची टक्केवारी वाढलेली नाही. उल्हासनगरमध्ये सर्वाधिक ४८.०९ टक्के मतदान झाले आहे. आगरी मताचे राजकारण रंगलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात ४५. ०७ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे ही मते कुणाच्या पारडयात पडतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

भाजप लागली कामाला

डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे. काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार वगळल्याचा गोंधळ होऊन तब्बल साडेनऊ हजार नावे वगळली गेल्याने याचा धसका भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत विशेष घातले आहे.

- Advertisement -

विधानसभा निहाय मतदान टक्केवारी

अंबरनाथ : ४७ . ४७ %

उल्हासनगर : ४८. ०९ %

कल्याण पूर्व : ४२. १३ %

डोंबिवली : ४२ .२७ %

कल्याण ग्रामीण : ४५. ०७ %

मुंब्रा- कळवा : ४६.९७ %

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -