घरमुंबईहाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी करावी लागणार प्रतिक्षा

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी करावी लागणार प्रतिक्षा

Subscribe

वाहन चोरीच्या घटनांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना

वाहन सुरक्षितता आणि वाहन चोरीच्या घटना लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून नवीन उत्पादित होणार्‍या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असणार आहे. असे असले तरी त्यासाठी अजून किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता परिवहन विभागातील अधिकारी व्यक्त करतात.

वाहन सुरक्षिततेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने डिसेंबर २०१८ मध्ये वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला. या नंबरप्लेट कशा असाव्यात, त्यावर कोणती माहिती असावी, नंबर प्लेटचा आकार कसा असावा, याचे सर्व निकष मंत्रालयाने ठरवून दिलेले आहेत. तसेच या नंबरप्लेट वाहन उत्पादक किंवा वाहन वितरकांनी वाहनांना बसवून देण्याची सूचनाही मंत्रालयाने केली. त्यानुसार १ एप्रिलपासून उत्पादित होणार्‍या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट बसविण्यात येणार आहे. त्यासाठी परिवहन आयुक्तांनी शेखर चन्ने यांनी परिपत्रक देखील काढले आहे. राज्यात १ एप्रिलपासून उत्पादित होणार्‍या गाड्यांवर नवीन नंबर प्लेट लागणार आहे.

- Advertisement -

परंतु नवीन गाडी उत्पादित होण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन नंबर प्लेटसाठी काही कालावधी लागणार आहे. तसेच वाहन उत्पादकांनी वाहन ४.० या पोर्टलवर प्रत्येक सिक्युरिटी कोड अपडेट करणे बंधनकारक असणार आहे.त्यामुळे उत्पादकांना डिलर देखील नेमावे लागणार आहेत. परिणामी नवीन नंबर प्लेटसाठी काही दिवसांची वाट पहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -