घरक्रीडाटोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे असेल अवघड

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे असेल अवघड

Subscribe

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मागील तीन ऑलिम्पिकमध्ये (२००८, २०१२, २०१६) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१२ ऑलिम्पिकमध्ये तिने कास्यपदक जिंकले होते. त्यामुळे २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदक मिळविण्याचे तिला प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, मागील तीन ऑलिम्पिकपेक्षा टोकियोतील ऑलिम्पिक हे अधिक अवघड आव्हान असेल आणि त्यासाठी फिटनेस सुधारण्यावर अधिक भर देत आहे, असे सायनाने सांगितले.

टोकियोतील स्पर्धा ही अधिक अवघड असेल. चीनचे खेळाडू खूपच चांगले प्रदर्शन करत आहेत. त्याशिवाय इतर महिला खेळाडूही खूप चांगला खेळ करत आहेत. त्यामुळे पुढील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे खूप अवघड आव्हान आहे. मात्र, सध्या तरी मी ऑलिम्पिकवर किंवा त्यासाठी पात्रता मिळवण्यावर मी लक्ष केंद्रित केलेले नाही. मी पुढील स्पर्धांमध्ये अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याबाबतच विचार करीत आहे. तसेच स्वत:ला दुखापत होणार नाही आणि फिट कशी राहीन, यासाठीदेखील काळजी घेणार आहे, असे सायनाने सांगितले.

- Advertisement -

सायना २०१५ मध्ये काही आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर होती. २०१६ मध्ये तिच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने प्रदीर्घ काळ खेळापासून दूर रहावे लागले होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिने पुनरागमन केले. पण, त्यानंतरही तिला दुखापतींनी त्रस्त केले आहे आणि त्यामुळे तिला पूर्वीप्रमाणे प्रदर्शन करता आलेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -