घरमुंबईWater Cut In Mumbai : मुंबईत पाणीबाणी; तब्बल 15 टक्के पाणी कपात

Water Cut In Mumbai : मुंबईत पाणीबाणी; तब्बल 15 टक्के पाणी कपात

Subscribe

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, मध्या वैतरणा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3, 850 दशलक्ष लिटर तर ठाणे, भिवंडी व निजामपूर या नगरबाह्य महापालिका हद्दीत दररोज 150 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथे कार्यरत ट्रान्सफार्मरला आग लागल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या आगीमुळे तेथील ट्रान्सफार्मर जळाले. सद्यस्थितीत दोन ट्रान्सफार्मर सुरु करण्यात आले असून त्या आधारे 20 पैकी 15 पंप सुरू करण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी, तिसरा ट्रान्सफार्मर सुरु होण्यास 5 मार्चपर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. या कारणामुळे संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व निजामपूर नगर बाह्य विभाग येथील मुंबई 2 व 3 जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. (Water Cut In Mumbai Water shortage in Mumbai As much as 15 percent water reduction)

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, मध्या वैतरणा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3, 850 दशलक्ष लिटर तर ठाणे, भिवंडी व निजामपूर या नगरबाह्य महापालिका हद्दीत दररोज 150 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.

- Advertisement -

मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका पिसे बंधारा येथून नदी पात्रातील अशुद्ध पाणी पंपिंग स्टेशनद्वारे उचलून त्यावर जल शुद्धीकरण प्रक्रिया केल्यावर ते पाणी मोठ्या टाकीत साठवून पुढे मुंबईला मोठ्या जलवाहिनीद्वारे पुरवले जाते. मात्र यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पिसे पंपिंग स्टेशनमधील संयंत्रात भीषण आग लागल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे घडली. त्यामुळे सदर पंपिंग स्टेशनमधील संयंत्र जळाले. जल अभियंता खत्याने प्राथमिक अंदाजानुसार, दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी 24 तासांचा कालावधी अंदाजित केला होता.

मुंबई महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्वपदावर येत आहे. सद्यस्थितीत दोन ट्रान्सफार्मर सुरु होवून त्या आधारे 20 पैकी 15 पंप सुरू करण्यात आले आहेत. असे असले तरी, तिसरा ट्रान्सफार्मर सुरु होण्यास 5 मार्च 2024 पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. या कारणाने, संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई 2 व 3 जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला सोमवारी सायंकाळी लागलेली आग रात्री दहा वाजता विझवण्यात यश आले. त्यानंतर रात्री बारा वाजेच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर सुरू करून त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : Nana Patole : लोकसंख्या कमी होत असते की वाढते? ‘आपलं महानगर’च्या वृत्तानंतर पटोलेंनी सरकारला घेरलं

तसेच, मंगळवरी पहाटे चार वाजेपासून पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील आठ पंप सुरू करण्यात आले. तर, सकाळी नऊ वाजेपासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला व त्यावर पिसे उदंचन केंद्रातील इतर सात पंप हळूहळू सुरू करण्यात आले. अशा रितीने सद्यस्थितीत पिसे केंद्रातील 20 पैकी सुमारे 15 पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. या केंद्रातील उर्वरित पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच परिरक्षणाखाली असलेला तिसऱ्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्यासाठी साधारणतः 5 मार्च 2024 पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे.
अशा रितीने संपूर्ण पिसे पंपिंग स्टेशन पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यास साधारणतः 5 मार्चपर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. यास्तव मुंबई महापालिकेद्वारे होणारा एकूण पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून 5 मार्चपर्यंत संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे यामध्ये 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा : CM Eknath Shinde : दैनंदिन जीवनातील अधिकाधिक वापर मराठी भाषेला समृद्ध करेल- मुख्यमंत्री शिंदे

तसेच, ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई 2 व 3 जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. या पाणी कपातीमुळे विभागातील पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकाचा भाग व डोंगराळ उंचीवरील भाग यास थोड्या अधिक प्रमाणात अपुरा पाणीपुरवठा जाणवू शकतो.
अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा कमी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल महापालिका प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे. तसेच, मुंबईकर नागरिकांनी पाणी कपातीच्या कालावधीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -