घरमुंबईअशी प्रगती काय कामाची ?

अशी प्रगती काय कामाची ?

Subscribe

शाहीर-आनंद सावंत…

निवडणूक कोणतीही असली तरी सामान्य, गरीब, कामगाराने मतदान करावे असे पक्षाबरोबर उमेदवाराला वाटत असते आणि त्यांच्याप्रमाणे हेच लोक मतदानाला उतरत असतात. मतदान करा अशी जी काही जाहिरातबाजी होते, ही सुट्टीचा गैरफायदा घेणार्‍या, आळसावलेल्या श्रीमंत लोकांसाठी असते. ते या सुट्टीचा वापर आराम करण्यासाठी किंवा सहलीला जाण्यासाठी करित असतात. असे असताना या सरकारला गरीबांचा विसर पडलेला असतो. आम्ही शाहीर म्हणजे लोककलेचे सेवक. फक्त कलेची सेवा करणे हेच आम्हाला माहीत असते.

- Advertisement -

बरेचसे उमेदवार या लोककलावंतांचा वापर करून प्रचाराचे कार्य करत असतात. तेही अल्प मानधनात ही सेवा देत असतात. असे असतानासुद्धा उतरत्या वयात सरकारच्यावतीने दिले जाणारे पेन्शन वेळच्यावेळी मिळेलच याची खात्री देता येत नाही. गेली दोन वर्षे ही पेन्शन दिलेली नाही. इतकेच काय तर सांस्कृतिक संचालनालय अशा कलाकारांच्या संपर्कात नाही असेही दिसते.

पेन्शन वाढवून देऊ नका पण निदान जे दिले जाते ते वेळच्यावेळी द्या असे लोककलाकारांचे गार्‍हाणे आहे. भारताचा विकास करताना गोरगरिबांचेही पालनपोषण करा असे मला प्रामाणिकपणे वाटते. रस्ते, पूल, मेट्रो, मोनो या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती दिसते आहे. पण या प्रगतीत सामान्य माणसाचे जीवन मुश्किल होत असेल तर ती प्रगती काय कामाची असाही प्रश्न पडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -