घरमुंबईसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'बाजीराव'चा मृत्यू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘बाजीराव’चा मृत्यू

Subscribe

गेल्या काही दिवसापासून बाजीराव स्नायुदुखी आणि संधीवातामुळे आजारी होता. तसंच गेल्या १० दिवसापासून तो चालला सुध्दा नाही.

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पांढऱ्या वाघाचा आज मृत्यू झाला आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘बाजीराव’चा वयोमानामुळे मृत्यू झाला आहे. २००१ मध्ये बाजीरावचा जन्म झाला होता. गेल्या काही दिवसापासून तो आजारी होता. आज वयाच्या १८ व्या वर्षी बाजीरावने अखेरचा श्वास घेतला. बाजीरावला पहाण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी व्हायची. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पांढऱ्या वाघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बाजीरावच्या मृत्यू वार्धक्यामुळे झाला आहे दरम्यान, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. उद्यानातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, बाजीरावचा जन्म २००१ साली झाला होता. रेणुका आणि सिध्दार्थ या वाघांच्या जोडीपासून बाजीरावचा जन्म झालो होता. गेल्या काही दिवसापासून बाजीराव स्नायुदुखी आणि संधीवातामुळे आजारी होता. गेल्या १० दिवसापासून तो चालला सुध्दा नाही. त्याच्या उपचारा दरम्यान आज मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर बाजीराव वाघावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -